फक्त 1300 मध्ये 40 तास बॅटरी लाईफ देणारा Bluetooth Neckaband सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Published: January 4, 2022 04:40 PM2022-01-04T16:40:52+5:302022-01-04T16:41:21+5:30

Boult ProBass ZCharge: 40 तास बॅटरी लाईफ देणारे Boult ProBass ZCharge वायरलेस नेकबँड ईयरफोन लाँच करण्यात आले आहेत. हे इयरफोन्स Amazon वरून ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येतील.  

Boult probass zcharge wireless neckband earphones launched in just 1299 rupees sith 40 hour battery   | फक्त 1300 मध्ये 40 तास बॅटरी लाईफ देणारा Bluetooth Neckaband सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

फक्त 1300 मध्ये 40 तास बॅटरी लाईफ देणारा Bluetooth Neckaband सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Next

Boult नं आपले नवीन नेकबँड ब्लूटूथ इयरफोन्स भारतात सादर केले आहेत. कंपनीचे Boult ProBass ZCharge इयरफोन्स 40 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देतात. तसेच फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर तुम्ही 15 तास गाणी ऐकू शकता. यात फक्त आवाजाने डिवाइस कंट्रोल करण्यासाठी व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे.  

Boult ProBass ZCharge ची किंमत  

Boult ProBass ZCharge ची किंमत 1,299 रुपये ठेवण्यात आली आहे. सोबत कंपनी एक वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. हे इयरफोन्स Amazon वरून विकत घेता येतील. कंपनीनं या ऑडिओ डिवाइसचे ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.  

Boult ProBass ZCharge चे स्पेसिफिकेशन्स 

Boult ProBass ZCharge मध्ये 14.2mm च्या ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात Bluetooth v5.2 ची कनेक्टिव्हिटी मिळते. कंपनीनं यात ऐरोस्पेस-ग्रेड एलॉय मायक्रो वूफर्सचा वापर केला आहे. जे बेसिक ऑडियो सिग्नेचर कायम ठेऊन एक्स्ट्रा बेस देतात. तर यातील IPX5 रेटिंग पाणी तसेच घामापासून डिवाइसचा संरक्षण करते.  

Boult ProBass ZCharge सिंगल चार्जवर 40 तासांची बॅटरी लाईफ देऊ शकतात, असा दावा कंपनीनं केला आहे. जर तुम्ही घाईत असाल तर तुम्ही फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 15 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळू शकता. यातील व्हॉइस कंट्रोल फिचरच्या मदतीनं फक्त बोलून म्युजिक, व्हॉल्युम आणि कॉल कंट्रोल करता येतात.  

हे देखील वाचा:

सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा...

थिएटरचा अनुभव घरच्या घरी; स्वस्तात विकत घ्या 43 इंचाचे हे स्मार्ट टीव्ही, Flipkart देतंय भारी डिस्काउंट

Web Title: Boult probass zcharge wireless neckband earphones launched in just 1299 rupees sith 40 hour battery  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.