अँड्रॉइड ओ : आगमनाची तयारी पूर्ण आता नावाची उत्सुकता !

By शेखर पाटील | Published: August 14, 2017 11:08 AM2017-08-14T11:08:58+5:302017-08-14T11:13:29+5:30

गुगलने आपल्या अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमच्या ८.० म्हणजेच 'ओ' आवृत्तीला पुढील आठवड्यात लाँच करण्याचे संकेत दिले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

Android o: Ready to come to the arrivals now full of excitement! | अँड्रॉइड ओ : आगमनाची तयारी पूर्ण आता नावाची उत्सुकता !

अँड्रॉइड ओ : आगमनाची तयारी पूर्ण आता नावाची उत्सुकता !

Next
ठळक मुद्देगुगलची मालकी असणारी अँड्रॉइड ही जगातील सर्वाधीक लोकप्रिय मोबाईल ऑपरेटींग सिस्टीमअँड्रॉइड ८.० म्हणजेच अँड्रॉइड ओ ही आवृत्ती अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार आहे.नावाच्या या स्पर्धेत ऑरेंज, ऑक्टोपस, ओटमील कुकीज आदी असल्याचेही मानले जात आहे.

गुगलने आपल्या अँड्रॉइड या ऑपरेटींग सिस्टीमच्या ८.० म्हणजेच 'ओ' आवृत्तीला पुढील आठवड्यात लाँच करण्याचे संकेत दिले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
गुगलची मालकी असणारी अँड्रॉइड ही जगातील सर्वाधीक लोकप्रिय मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असून याचे आजवर सात व्हर्जन्स युजर्सला सादर करण्यात आले आहे. लवकरच अँड्रॉइड ८.० म्हणजेच अँड्रॉइड ओ ही आवृत्ती अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार आहे. गुगलने अतिशय कल्पकतेने अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना मिष्ट पदार्थ अथवा डेझर्टस्चे नाव दिले आहेत. मे महिन्यात झालेल्या गुगलच्या आय/ओ कॉन्फरन्समध्ये अँड्रॉइड ८.० या आवृत्तीचे फिचर्स सादर करण्यात आले. यानंतर ही प्रणाली बीटा म्हणजेच प्रयोगात्मक स्थितीत वापरण्याची सुविधा देण्यात आली. याचे अनेक प्रिव्ह्यू सादर करण्यात आले. आणि आता ही प्रणाली अधिकृतपणे लाँच होणार आहे. विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी गुगल कंपनी आपली ही नवीन आवृत्ती सादर करू शकते. या दिवशी अमेरिकेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. हे या प्रकारचे एकविसाव्या शतकातील पहिलेच सूर्यग्रहण असून या अविस्मरणीय दिवसाचे औचित्य साधून अँड्रॉइड प्रणालीची ओ आवृत्ती सादर होईल असे मानले जात आहे. तर काही तज्ज्ञांनी यानंतरच्या काही दिवसांमध्ये याची अधिकृत घोषणा होईल असा दावा केला आहे. अर्थात अँड्रॉइड ओ अधिकृतपणे लाँच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
यापैकी किटकॅट, मार्शमॅलो, नोगट, आईस्क्रीम सँडविच आदी नावे आपल्या कानावरून गेली असतीलच. या पार्श्‍वभूमिवर अँड्रॉइड ओ आवृत्तीचे नेमके नाव काय असेल ? याची जगभरात प्रचंड उत्सुकता लागली आहे. मध्यंतरी गुगलने यासाठी जगभरातून युजर्सकडून सूचनादेखील मागविल्या होत्या. अर्थात अँड्रॉइड ८.० या प्रणालीचे नाव नियमानुसार ओ या आद्याक्षणावरून असल्याने यावरूनच सुरू होणार्‍या मिष्ट पदार्थांमधून याचे नाव निवडले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांच्या मते ओरियो या क्रिमयुक्त कुकीजचे नाव याला दिले जाणार आहे. तर नावाच्या या स्पर्धेत ऑरेंज, ऑक्टोपस, ओटमील कुकीज आदी असल्याचेही मानले जात आहे. यात ऑरेंज म्हणजेच संत्री हे रूढ अर्थाने मिष्ट पदार्थ नाही. तथापि आयओएसची ओळख अ‍ॅपलशी जुळलेली असल्याने अँड्रॉइड ८.० ला ऑरेंजशी जोडले जाण्याची शक्यता आहे. तर या आवृत्तीच्या डेव्हलपर प्रिव्ह्यूमध्ये ऑक्टोपसची आकृती दिसून आल्यामुळे याचे नाव ऑक्टोपस असण्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे. अर्थात अँड्रॉइड आणि गोडवा यांच्यातील संबंध आठव्या आवृत्तीपासून तुटण्याचे भाकीत यातून करण्यात आले आहे. तथापि, येत्या काही दिवसात याचे रहस्योद्घाटन होणार आहे.

Web Title: Android o: Ready to come to the arrivals now full of excitement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.