6 जीबी रॅमयुक्त ओप्पो एफ 3 प्लस

By शेखर पाटील | Published: November 14, 2017 12:47 PM2017-11-14T12:47:00+5:302017-11-14T12:50:13+5:30

ओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांना ६ जीबी रॅम असणारा ओप्पो ३ प्लस हा स्मार्टफोन सादर केला आहे. आधी लाँच केलेल्या ओप्पो ३ या मॉडेलची ही सुधारित आवृत्ती आहे.

6 GB Rammed OPPO F3 Plus | 6 जीबी रॅमयुक्त ओप्पो एफ 3 प्लस

6 जीबी रॅमयुक्त ओप्पो एफ 3 प्लस

Next

ओप्पो कंपनीने अलीकडेच भारतीय ग्राहकांसाठी ओप्पो एफ ३ हा स्मार्टफोन सादर केला आहे. यात उत्तम दर्जाच्या ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज देण्यात आले होते. ओप्पो एफ ३ प्लस या मॉडेलमध्ये वाढीव रॅम प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून १६ नोव्हेंबरपासून २२,९९० रूपयात उपलब्ध होणार आहे. यासोबत फ्लिपकार्टने काही ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात ३ हजार रूपयांचा डिस्काऊंट, शून्य टक्के व्याजदराने इएमआय, एचडीएफसीच्या क्रेडीट व डेबिट कार्डवर ५ टक्क्यांची सूट, ५० टक्के मूल्यात बायबॅकची गॅरंटी आणि तीन महिन्यांपर्यंत हॉटस्टार या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेची मोफत प्रिमीयम सेवा आदींचा समावेश आहे.

ओप्पो एफ ३ प्लस या मॉडेलमध्ये १६ आणि ८ मेगापिक्सल्सचे दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील दुसरा कॅमेरा हा १२० अंशाच्या लेन्सने सज्ज आहे. याच्या मदतीने उत्तम दर्जाचा ग्रुप सेल्फी घेता येईल. तसेच दोन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत इफेक्टमुळे दर्जेदार सेल्फी काढता येतील. यात स्मार्ट फेशियल हे फिचर इनबिल्ट स्वरूपात देण्यात आले आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण करणे शक्य आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यांमध्ये ब्युटिफाय ४.०, सेल्फी पॅनोरामा, स्क्रीन फ्लॅश आणि पाम शटर हे विशेष फिचर्स देण्यात आले आहेत.

यात ६ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा अर्थात फुल एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. १.५ गेगाहर्टझ ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७५०टी या प्रोसेसरने युक्त असणार्‍या या मॉडेलची रॅम वर नमूद केल्यानुसार ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलर ३.० हा युजर इंटरफेस असेल. तर यात अल्ट्रा फास्ट व्हिओओसी तंत्रज्ञानाने युक्त ४,००० मिलीअँपिअर इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. 

Web Title: 6 GB Rammed OPPO F3 Plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.