१ टक्के बॅटरीवरही १ तास चालणार, ५० मेगापिक्सेलचे ४ कॅमेरे; Xiaomi 13 Ultra लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:52 AM2023-04-19T11:52:26+5:302023-04-19T11:53:20+5:30

पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत जबरदस्त फीचर्स

1 hour battery life on 1 percent battery 4 cameras of 50 megapixels Xiaomi 13 Ultra launched china market | १ टक्के बॅटरीवरही १ तास चालणार, ५० मेगापिक्सेलचे ४ कॅमेरे; Xiaomi 13 Ultra लाँच

१ टक्के बॅटरीवरही १ तास चालणार, ५० मेगापिक्सेलचे ४ कॅमेरे; Xiaomi 13 Ultra लाँच

googlenewsNext

शाओमीनं (Xiaomi) आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीनं मंगळवारी चिनी बाजारपेठेत Xiaomi 13 Ultra सादर केला. चिनी ब्रँडचा हा या वर्षातील सर्वात जास्त गाजलेला फोन आहे. यामध्ये Leica ब्रँडिंग आणि ट्यूनिंग असलेले कॅमेरा सेटअप देण्यात आलेय.

स्मार्टफोनमध्ये हायबरनेशन मोड देण्यात आले आहे, जे बॅटरीच्या वापराला ऑप्टिमाईज करते. हे फीचर लो बॅटरी दरम्यान काम करेल. Xiaomi हँडसेटमध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर आणि इतर पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. पाहूया काय आहे यात खास.

किती आहे किंमत?
हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आलाय. याशिवाय तीन कॉन्फिगरेशनमध्ये हा स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो. फोनच्या बेस व्हेरिअंटची म्हणजेच 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 5,999 युआन (सुमारे 71,600 रुपये) आहे. त्याच वेळी, त्याचा 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिअंट 6,499 युआनमध्ये (सुमारे 77,500 रुपये) खरेदी करता येणार आहे.

या स्मार्टफोनचे टॉप व्हेरिअंट 16GB RAM + 1TB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 7,299 युआन (सुमारे 87 हजार रुपये) आहे. हा स्मार्टफोन अन्य बाजारपेठांमध्ये केव्हा लाँच केला जाईल याबद्दल कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
Xiaomi 13 Ultra ड्युअल सिम सपोर्टसह येतो. यात 6.73-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय, जो 120Hz रिफ्रेश रेट, 1300Nits ब्राईटनेससह येतो. हँडसेट Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरवर काम करतो.

यात 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा पर्याय देण्यात आलाय. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे कॅमेरा. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची मुख्य लेन्स 50MP सह 1-इंचाचा IMX989 सेन्सर आहे. याशिवाय तीन 50MP IMX858 सेन्सर उपलब्ध आहेत. पुढील बाजूला कंपनीनं 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आलीये. जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये हायबरनेशन मोड देण्यात आला आहे, जो फोनची बॅटरी 1 टक्के राहिल्यावर ॲक्टिव्ह होतो. त्याच्या मदतीनं, 1 टक्के बॅटरीवरही फोन 60 मिनिटं सुरू राहू शकतो.

Web Title: 1 hour battery life on 1 percent battery 4 cameras of 50 megapixels Xiaomi 13 Ultra launched china market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.