वेश्यागृहांवर धाड!

  • First Published :11-January-2017 : 00:05:54

  • शहादा : शहरातील नव्या भाजीपाला मार्केट लगतच्या झोपडय़ांमध्ये चालणा:या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकत                      70 महिलांना ताब्यात घेतल़े या कारवाईच्यावेळी पोलिसांच्या हाती 25 आंबटशौकीन युवक लागल़े यातील काही विद्यार्थी चक्क गणवेशात होत़े

    पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना याबाबत माहिती मिळाल्यामुळे त्यांनी  कारवाई करण्याचे आदेश दिले होत़े  मंगळवारी दुपारी दीड वाजेपासून कारवाईस प्रारंभ झाला. पोलीस उपनिरीक्षक          निलिमा सातव व महिला पोलिसांनी बाजारपेठेलगतच्या  झोपडय़ांमधून युवती आणि महिलांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने एकच  पळापळ सुरू झाली, मात्र  त्या ठिकाणी साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल़े या सर्वाना शहादा पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केल़े

    दरम्यान, याठिकाणी  वेश्याव्यवसाय चालवणा:या दोन महिलांवर पिटाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आह़े दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू असताना काही राजकीय पुढारी, दलाल यांच्याकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू होता़  तर ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन युवकांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली़ हे विद्यार्थी शहादा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या गणवेशात असल्याने पोलिसांनी त्यांना केवळ समज दिली़महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS