सोलापूरात एटीएमला आग

  • First Published :11-January-2017 : 15:25:03

  • ऑनलाइन लोकमत
    सोलापूर, दि. ११ - सोलापूरात चक्क एटीएमलाच आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी  घडली. आसरा चौकातील अ‍ॅक्सीस बँकेचं एटीएम आहे. अचानक या एटीएम सेंटरमधील मशीनने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या आगीमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
    या एटीएममध्ये  रोकड नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. या आगीमध्ये संपूर्ण एटीएम जळून खाक झालं आहे. एटीएम शेजारीच अनेक  दुकने असल्याने आग पसरण्याची भीती होती. मात्र, अग्निशमन दलाला वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने एक मोठी दुर्घटना टळली.
महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या