पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे २२ फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:51 PM2018-06-26T17:51:07+5:302018-06-26T17:53:21+5:30

पंढरपूर आषाढी वारी : सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Zarband, 22, accused of criminal tendency in Panditpur Ashadhi Vary | पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे २२ फरार आरोपी जेरबंद

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे २२ फरार आरोपी जेरबंद

Next
ठळक मुद्दे५८६ साक्षीदार आणि आरोपी यांना एका दिवसात समन्स वॉरंट२२ फरारी आरोपींना जेरबंद करुन संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले

सोलापूर : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या २२ फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

 उमिर नासिर नाईकवाडी, माणिक आण्णाप्पा जाधव, गोपू बाबू राठोड, शिवाजी किशोर शिंदे, प्रकाश धुळा खरात, रामचंद्र हणुमंत कोळेकर,महेश सुखदेव जानकर, सर्जेराव दगडू मासाळ, सागर अजित कोळेकर, महेश जनार्धन कोळेकर, युवराज अनिल काळे, प्रशांत नवनाथ मिसाळ, बबलु ऊर्फ प्रवीण तात्या क्षीरसागर, संजय लक्ष्मण नवगिरे, पमादे नवलकिशोर सुधा, गुलाब महिबूबसाहेब खैराट, ईश्वर गणपत सरडे, सज्जन तानाजी गोरे, रवी तिम्मा बंदपट्टे, कैलास नाना माळी अशा विविध गुन्ह्यातील           फरारी आरोपींना जेरबंद करण्यात आले.

 दीड महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाने शहर आणि ग्रामीण भागात फरारी आरोपींचा शोध घेऊन २२ फरारी आरोपींना जेरबंद करुन संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

 फरारी आरोपी नाव, पत्ता, ठिकाण बदलून राहतात. अनेक वर्षे फरारी असल्याने गुन्हेगारांच्या चेहºयातही अनेक बदल घडून येतात. अशावेळी फरार गुन्हेगारांना शोधणे ही मोठी समस्या असते. पोलीस अधीक्षक प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग, सोलापूर तालुका, पंढरपूर तालुका, कुर्डूवाडी, मोहोळ, माढा, पंढरपूर शहर आणि करमाळा या आठ पोलीस ठाणे हद्दीतील फरारी आरोपींना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस हवालदार अल्ताफ काझी, सचिन वाकडे, पोलीस नाईक निशांत ठोकळी, रवी माने, विजयकुमार भरले, पांडुरंग काटे यांनी केली.

५८६ समन्स वॉरंट बजावले
विविध गुन्ह्यांतील ५८६ साक्षीदार आणि आरोपी यांना एका दिवसात समन्स वॉरंट बजावण्यात आले. यात अजामीनपात्र वॉरंट ७४, जामीनपात्र वॉरंट ९५ असे एकूण १६९ तर ४१७ जणांना समन्स बजावण्यात आले.  विशेष मोहीम उघडण्यात आली होती. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सर्व पोलीस ठाण्यामार्फत ही कारवाई केली.

Web Title: Zarband, 22, accused of criminal tendency in Panditpur Ashadhi Vary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.