उजनी धरणातील पाण्यात दररोज एक टक्का होतेय घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:23 PM2019-03-28T14:23:10+5:302019-03-28T14:29:46+5:30

गत मार्चमध्ये प्लस ५५ टक्के असलेल्या उजनीत आता वजा ११ टक्के पाणी 

Water in the Ujni Dam is reduced to one percent per day! | उजनी धरणातील पाण्यात दररोज एक टक्का होतेय घट !

उजनी धरणातील पाण्यात दररोज एक टक्का होतेय घट !

Next
ठळक मुद्देगेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लकचालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेलेजवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार

भीमानगर : उजनी धरणाची गेल्या वर्षाच्या तुलनेत कमालीची पाणीपातळी घटली आहे. बुधवारी उजनीची एकूण पाणीपातळी ४९०.११० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा मायनस १६२८.८४ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस १७३.९७ दलघमी आहे. उजनी धरणाची टक्केवारी मायनस ११.४७ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणात प्लस ५५.८५ टक्के पाणीसाठा होता. 

गेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लक होता. परंतु चालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेले. म्हणजेच पाण्याचा भरपूर अपव्यय झाला आहे. याचा परिणाम येणाºया एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत जाणवणार आहे. अशात उष्णता भरपूर असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे.

जवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार आहे. त्यातच सोलापूर पाणीपुरवठा योजना, एनटीपीसी व बारामती एमआयडीसी या सगळ्या योजनांबरोबरच अनेक उपसा सिंचन योजनांना पाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी उपसा बेसुमार सुरू आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील शेती उत्पादनावर होणार असून, वीज कपात अशा संकटाला शेतकºयांना सामोरे जावे लागणार आहे. यातून लाखो रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागणार आहे.

नदीला सात हजार शंभर क्युसेकने पाणी सोडले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला असून, पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकºयांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी आता करू लागला आहे. पुणे जिल्ह्याला वेगळा न्याय व सोलापूर जिल्ह्याला वेगळा न्याय का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

रोज एक टक्का पाणी घटतेय !
- उजनीतून भीमा नदीला ७,१०० क्युसेक तर कालव्याला २,९५० क्युसेक, बोगदा ५२० क्युसेक असे १०,५२० क्युसेक पाणी सोडल्याने रोज एक टक्का पाणी कमी होत आहे. सोलापूर, पंढरपूर अशा मोठ्या शहरांना जल संकटाचा सामना करावा लागणार असून, येणाºया काळात शेतीबरोबरच शहरांनासुद्धा पाण्याचे संकट बसणार आहे. उद्योगांवरसुद्धा याचा परिणाम दिसून येणार आहे.

Web Title: Water in the Ujni Dam is reduced to one percent per day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.