सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:14 PM2019-03-13T14:14:39+5:302019-03-13T14:16:40+5:30

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष ...

Water conservation in Solapur city; The neglect of two BJP ministers, Shivsena corporators are accused | सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

सोलापूर शहरावर जलसंकट; भाजपच्या दोन मंत्र्यांचे दुर्लक्ष, शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

Next
ठळक मुद्देउजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहेमनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षऔज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. येथील मनपाच्या पंपगृहात नवीन पंप बसविण्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे औज बंधारा कोरडा पडला असून, शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याबाबत भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी  केला. 

शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी सकाळी महापालिकेच्या उजनी येथील पंपगृहाला भेट दिली. नगरसेवक राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, भारतसिंग बडूरवाले, उमेश गायकवाड, विठ्ठल कोटा, शशिकांत कैंची, युवा सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल वानकर, रामदास मगर आदी उपस्थित होते. नगरसेवकांनी येथील कर्मचाºयांकडून कामकाजाची माहिती घेतली. या पाहणीत अनेक बाबतीत मनपा प्रशासनाची उदासीनता दिसून आली.

नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, उन्हाळ्याच्या तोंडावर सोलापूरवर मोठे जलसंकट येऊ शकते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली होती. औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी इनटेकमधील पाणी २५ मार्चपर्यंत पुरणार आहे. जलसंपदा विभागाने औजमधील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे सांगितले. पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत कमालीचा फरक आहे. कर्नाटकातील गावे दररोज ७० एमएलडी पाण्याचा उपसा करीत आहेत. मंद्रुप येथील पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी उपसा सुरू आहे. औज बंधारा कोरडा पडल्याने उजनी धरणातून वेळेवर पाणी सोडायला हवे. भाजपच्या दोन मंत्र्यांनी पाठपुरावा करायला हवा. पण तो केला जात नाही.  

‘अमृत’चे पंप बसविण्यास उशीर
- उजनी पंपगृहातील सहापैकी चार पंप सुरू आहेत. दोन पंप पर्यायी पंप म्हणून ठेवले आहेत. कार्यरत असलेल्या दोन पंपांना मोठी गळती आहे. अमृत योजनेतून हे पंप बदलण्याचा निर्णय झाला. दोन महिन्यांपूर्वी पंप दाखल झाले आहेत; मात्र ते बदलण्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने यापूर्वीच हे पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत करणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. हे काम लवकर झाले नाही तर शहराला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागेल. पंपगृहाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. सदर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. ही प्रशासनाची मोठी चूक आहे, असे शिवसेना नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले.

उजनीतील पाणी कमी झाल्यानंतर दुबार पंपिंग केले जाते. त्यासाठी दरवर्षी ३० लाख रुपयांचा खर्च केला जातो. पण दुबार पंपिंगचे काम आणखी अर्धा किलोमीटर आत नेल्यास मनपा प्रशासनाचा खर्च वाचेल. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. 
- राजकुमार हंचाटे, शिवसेना, नगरसेवक 

Web Title: Water conservation in Solapur city; The neglect of two BJP ministers, Shivsena corporators are accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.