सैराट फेम विहिरीत पडून वारकऱ्यांचा मृत्यू

By admin | Published: June 29, 2017 12:29 PM2017-06-29T12:29:57+5:302017-06-29T12:29:57+5:30

-

Warkaris death by sarat fame well | सैराट फेम विहिरीत पडून वारकऱ्यांचा मृत्यू

सैराट फेम विहिरीत पडून वारकऱ्यांचा मृत्यू

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर/ करमाळा : करमाळा येथील देवीचामाळावरील अष्टकोनी विहिरीत पडून वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवार दि २९ जून रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली़
मोहन नामदेव घोगळ (वय ७५ रा़ वाकडी खंडोबाची ता़ राहता जि़ अहमदनगर) असे मयत वारकऱ्याचे नाव आहे़ मयत मोहन घोगळ हे पहाटे शौचालयास जात होते़ यावेळी अंघोळीसाठी पाणी आणण्यासाठी विहिरीत उतरले असता पाय घसरून पाण्यात पडले़ पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी अंत झाला़ या घटनेची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे़ घटना घडलेली विहिर ही सैराट चित्रपटात चित्रीकरण करण्यात आलेली विहिर आहे़

Web Title: Warkaris death by sarat fame well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.