दुष्काळाशी लढा; 'पाणी फाउंडेशन' च्या मदतीने शेलगावात तयार होतेय पौष्टीक गवताची नर्सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:07 AM2020-07-15T09:07:58+5:302020-07-15T09:08:45+5:30

कुरण क्षेत्र वाढण्यास होणार मदत; दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

Village news; A nutritious grass nursery is being set up in Shelgaon with the help of 'Pani Foundation' | दुष्काळाशी लढा; 'पाणी फाउंडेशन' च्या मदतीने शेलगावात तयार होतेय पौष्टीक गवताची नर्सरी

दुष्काळाशी लढा; 'पाणी फाउंडेशन' च्या मदतीने शेलगावात तयार होतेय पौष्टीक गवताची नर्सरी

googlenewsNext

जेऊर : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातली जनावरं चारा छावण्यांमध्ये बांधण्याची वेळ बळीराजावर येते. जनावरांची पौष्टिक चाऱ्याची गरज भरून निघावी आणि पौष्टिक व सकस गवत गावातच उपलब्ध व्हािवा या उद्देशाने शेलगाव क ( ता. करमाळा) या गावांमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने  शेतकऱ्यांनी सरी पाडून, बेड्स तयार करून पोस्टीक गवताची पाच गुंठ्यांत लागवड करण्यात आली आहे.


या पाच गुंठा मध्ये पांढरी आंजण-काळी, आंजण, धामण, मारवेल, रोडस -डोंगरी, पवण्या शेडा, पांढरी कुसळ इत्यादी जातीच्या गवताची नर्सरी तयार करण्यात आली आहे. गवताची पूर्ण वाढ झाल्यानंतर यावर्षी पाणी फाउंडेशन 'समृद्ध गाव स्पर्धा' च्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांना पौष्टीक गवत वाटण्यात येणार आहे.  करमाळा तालुक्यातील कुरण धन वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वी होईल आणि तालुक्यातील गावागावांमध्ये संरक्षित कुरण क्षेत्र विकसित झालेली पहायला मिळतील असा विश्वास तालुका समन्वयक  प्रतीक गुरव यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केला.
–------------------------
पौष्टीक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास होणार मदत
जनावरांना चराईसाठी मोकाट सोडणे, बेसुमार तोड यांमुळे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो. यातून अनेक गवत नामशेष होते या नामशेष होऊ लागलेल्या पौष्टीक गवतांना नर्सरी च्या माध्यमातून पुनरूज्जीवित करून त्यांचा प्रसार महाराष्ट्रातील गावा-गावात करण्यासाठी पानी फाउंडेशनने काम करत आहे. यातून कुराणाचे व पौष्टीक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास मदत  होणार आहे.

 

भविष्यात जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक गावाने गायरान वनात,उपलब्ध सार्वजनिक जमिनीवर अथवा बांधावर चराई बंदी करून पौष्टिक गवताची लागवड करून जनावरांनसाठी राखीव चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.म्हणजे ज्यावेळेस आपल्या कडे चाऱ्याची कमतरता भासेल त्यावेळी जनावरांना तो राखीव चारा उपलब्ध होईल.आणि निश्चितच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल
 - प्रतिक गुरव
तालुका समन्वयक, करमाळा, पाणी फाउंडेशन

Web Title: Village news; A nutritious grass nursery is being set up in Shelgaon with the help of 'Pani Foundation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.