सोलापूरची सांस्कृतिक उंची वाढविणारे उर्दू ग्रंथप्रदर्शन, महापौर शोभा बनशेट्टी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:06 PM2017-12-23T16:06:19+5:302017-12-23T16:10:04+5:30

सोलापूर हे बहुभाषिक सांस्कृतिक केंद्र आहे. यात उर्दू भाषा व साहित्य संस्कृतीचे योगदान उल्लेखनीय आहे. अशा सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर उर्दु ग्रंथ प्रदर्शन भरत आहे याचा अभिमान वाटतो.

Urdu literature, which enhances the cultural height of Solapur, is being presented by Mayor Shobha Banesh | सोलापूरची सांस्कृतिक उंची वाढविणारे उर्दू ग्रंथप्रदर्शन, महापौर शोभा बनशेट्टी यांचे प्रतिपादन

सोलापूरची सांस्कृतिक उंची वाढविणारे उर्दू ग्रंथप्रदर्शन, महापौर शोभा बनशेट्टी यांचे प्रतिपादन

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर हे बहुभाषिक सांस्कृतिक केंद्र सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर उर्दु ग्रंथ प्रदर्शनउर्दु भाषा व साहित्य प्रेमी च्या सहभागातुन शोभा यात्रा उर्दू पुस्तक प्रदर्शनत एकूण ९२ ग्रंथ दालनाची मांडणी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : सोलापूर हे बहुभाषिक सांस्कृतिक केंद्र आहे. यात उर्दू भाषा व साहित्य संस्कृतीचे योगदान उल्लेखनीय आहे. अशा सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर उर्दु ग्रंथ प्रदर्शन भरत आहे याचा अभिमान वाटतो. या ग्रंथ प्रदर्शनातून सांस्कृतिक उंची नक्की वाढेल, असा विश्वास   महापौर शोभा बनशेट्टी यांनी काढले. 
केंद्रीय मनुष्यबल विकास मंत्रलयाच्या राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने, नवी दिल्ली औयोजिलेल्या २१ व्या अखिल भारतीय उर्दू ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार यूनुसभाई शेख होते. बज्मे गालिब सार्वजनिक वाचनालयांच्या संयुक्त सहकार्याने एम ए पानगल एंग्लो उर्दू प्रशालेच्या प्रांगनात  ९ दिवस चालणाºया या उर्दू ग्रंथ प्रदर्शनच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे संशोधन अधिकारी शाह नवाज खुर्रम व प्रसिद्धि अधिकारी शम्स शेख यांची उपस्थित होती. या शिवाय बज्मे गालिब संस्थेचे अध्यक्ष बशीर परवाज, डॉ फैज अहमद शेख, नगरसेवक रियाज खरादी, नगरसेविका वाहेदा भंडाले, साजिया शेख, नजीर शेख यांची ही उपस्थिति होती. संयोजन समिती चे कार्याध्यक्ष यु एन बेरिया यानी स्वागत तर शम्स शेख यांनी प्रस्ताविक केले. सकाळी उदघाटन सत्रापूर्वी उर्दु भाषा व साहित्य प्रेमी च्या सहभागातुन शोभा यात्रा काढण्यात आली. यात उर्दु विद्यार्थी सहभागी होते. 
अध्यक्षीय भाषणात युनुसभाई शेख यांनी उर्दू भाषा ही केवळ मुस्लिमाची असल्याचा आभास निर्माण करुण य्या भाषेला टोपी आणि दाडी चिटकवन्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न संकुचित प्रवृतिच्या मंडळीकडून होत असल्याची खंत व्यक्त केली. उर्दु भाषा ही केवल मुस्लिमानचि नसून याच देशात जन्मलेल्या सर्वांची भाषा आहे. स्वतंत्र चळवळीत इन्कलाब जिंदाबाद चा प्रेरणादायी बुलंद नारा याच उर्दू भाषेत दिला होता हे विसरून चालणार नाही असे ही शेख यांनी नमूद केले. प्रारंभी शालेय मुला मुलीनी उर्दू स्वागत गीत सादर केले. सुत्रसंचालन इलियास शेख तर आभार शफी कॅप्टन यांनी मानले. 
शहरात प्रथमच भरलेल्या उर्दू पुस्तक प्रदर्शनत एकूण ९२ ग्रंथ दालनाची मांडणी झाली असून त्यात विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक ऐतिहसिक कला संशोधन आदि अनेक विषयांचे हजारो उर्दू ग्रंथ उपलब्ध झाले आहे. ३१ पर्यंन्त चालनार्य या उर्दु ग्रंथ प्रदर्शनत नागरिकांची गर्दी होत आहे. 

Web Title: Urdu literature, which enhances the cultural height of Solapur, is being presented by Mayor Shobha Banesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.