सोलापुरात एकता दौड़; जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी धावले

By Appasaheb.patil | Published: October 31, 2022 03:56 PM2022-10-31T15:56:53+5:302022-10-31T15:56:59+5:30

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौड़ संपन्न

Unity Run in Solapur; Collector, police officer, municipal officer ran | सोलापुरात एकता दौड़; जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी धावले

सोलापुरात एकता दौड़; जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी धावले

googlenewsNext

सोलापूर : एकसंघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्या वतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासन, सोलापूर, जिल्हा क्रिड़ा अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटन  आणि  माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्‍त विदयमाने हुतात्मा चौक ते शासकीय विश्रामगृह साता रस्ता पर्यंत जिल्हास्तरीय एकता दौड़चे आयोजन करण्यात आले होते.

एकता दौड़ला पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, पोलीस उपायुक्त बापू बांगर, दिपाली धाटे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारतीय, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजुरकर, जिल्हा युवा अधिकारी अजीतकुमार, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितिन थेटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश सातपुते, डॉ विक्रम दबड़े, डॉ स्वप्निल कोठाडिया, विश्वास बिराजदार आणि सतीश घोड़के उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बैंड पथकद्वारे राष्ट्रगीतने करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व उपस्थितींना राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित ठेवण्याची शपथ दिली. पोलीस बैंड पथकाच्या विविध संगीत स्वराने संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला.  एकता दौड़मध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, सोलापूर रनर्स असोसिएशन, राज्य राखीव पोलीस दलातील जवान, क्यू.आर.टी. दल, एस.आर. पोलीस प्रशिक्षण केंद्र, उत्कर्ष क्रीडा मंडल, स्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्र, शहरातील विविध सामाजिक व क्रिड़ा संस्था, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दौड़चे समापन येथे करण्यात आला.

Web Title: Unity Run in Solapur; Collector, police officer, municipal officer ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.