शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या डोणगांव येथील दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:38 AM2018-12-25T11:38:38+5:302018-12-25T11:40:11+5:30

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील एका शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू ...

Two children drown in Donga, who went to eat sacks in the fields, drowned in water | शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या डोणगांव येथील दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या डोणगांव येथील दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देसमर्थ विपुल गायकवाड (वय ८), नंदिनी अशोक मस्के (वय ८) अशी मरण पावलेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील एका शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी ७.३० ते १२ दरम्यान अर्ध्या दिवसाची शाळा ठरली जीवघेणी. 

समर्थ विपुल गायकवाड (वय ८), नंदिनी अशोक मस्के (वय ८) अशी मरण पावलेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. समर्थ गायकवाड व नंदिनी मस्के हे दोन्ही विद्यार्थी डोणगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होते. दररोज या मुलांची शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चालत होती. सोमवारी काही कारणास्तव शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत ठेवण्यात आली होती. नेहमीपेक्षा सोमवारी शाळा लवकर सुटल्याने ही मुले घरी आली. समर्थ गायकवाड याचे वडील हे मजूर असून, ते दुसºयाच्या शेतात ऊस काढण्यासाठी गेले होते. आई नातेवाईकाच्या येथे कार्यक्रम असल्याने गेली होती. 

नंदिनी मस्के हिचे आई-वडीलही शेतात काम करण्यासाठी गेले होते. दोन्ही मुलांची घरे गावात जवळच होती. घरात कोणी नसल्याने या दोन्ही मुलांनी   शेतात बोरे खाण्याचा निर्णय घेतला. दोघांसोबत समर्थ याची लहान बहीण समृद्धीसुद्धा होती. सर्व जण घरापासून १ कि.मी. अंतरावर लांब असलेल्या शिवाप्पा आमले यांच्या शेतात गेले. तेथील झाडाची बोरं खाताना खेळत खेळत जवळच असलेल्या डबक्याजवळ गेली. जेसीबीच्या सहायाने खोदण्यात आलेल्या डबक्यात १० फूट पाणी होते. डबक्याजवळ खेळत असताना दोन्ही मुले पाण्यात पडली. हा प्रकार पाहून सोबत असलेली समृद्धी घराकडे पळत सुटली. तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने आपल्या शेजारच्या नातेवाईकांना सांगितला. 

हा प्रकार समजताच नीलेश गायकवाड व अरविंद गायकवाड हे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या प्रकारामध्ये एक ते दीड तासाचा काळ उलटून गेला होता. नीलेश गायकवाड याने पाण्यात उडी मारून मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. प्रथमत: नंदिनी मस्के ही मुलगी मिळून आली. तिला वर काढल्यानंतर पुन्हा नीलेश गायकवाड याने पाण्यात उडी मारली. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर समर्थ याला बाहेर काढण्यात यश आले. दोघांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघे मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे. 

Web Title: Two children drown in Donga, who went to eat sacks in the fields, drowned in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.