मोहोळजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक,एक ठार, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 02:13 PM2017-11-06T14:13:27+5:302017-11-06T14:14:43+5:30

पुण्याहून सोलापूरकडे निघालेली कार आणि सोलापूरहून मुंबईकडे जाणाºया ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर ९ जण जखमी झाले

A truck collided with a truck near Mohall, one killed and nine injured | मोहोळजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक,एक ठार, नऊ जण जखमी

मोहोळजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक,एक ठार, नऊ जण जखमी

Next
ठळक मुद्देमोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाचंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर ही घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी


आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोहोळ दि ६ : पुण्याहून सोलापूरकडे निघालेली कार आणि सोलापूरहून मुंबईकडे जाणाºया ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर ९ जण जखमी झाले. येथून दोन किलोमीटर अंतरावरील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर ही घटना घडली. अफसनाबानू महमद जावीद (वय १८, रा. मोघलपुरा, चारमिनार, हैदराबाद) असे मरण पावलेल्या युवतीचे नाव आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 
रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंध्र प्रदेश येथून नाशिककडे ट्रक (टीएन-४६/एस-७९४१) निघाला होता. त्याचवेळी पुण्याहून सोलापूरकडे टीएन-१२/ईई-३९२४ ही इरटिगा कार निघाली होती. चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली. अफसानाबानू जागीच मरण पावली तर महमद जाविद महमद हुसेन (वय- ४५), अमिनाबानू महमद इब्राहीम (वय- १७), मुबिनाबानू महमद इब्राहिम (वय- ३५), महमद बिलाला महमद जाविद (वय- २०), महमद उसामा महमद इब्राहिम (वय- १४), अमिनाबानू महमद इब्राहिम (वय-१३), समाधरबानू महमद जाविद (वय- १२) , सबिकाबानू महमद जाविद (वय- ४०), सुहाबानू महमद जाविद (वय- ८, सर्व रा .मोघलपुरा जवळ, चारमिनार हैदराबाद) हे जखमी झाले. यात अमिनाबानू इब्राहिम हिच्यासह दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनि नागराज  निंबाळे, नाईक सुभाष गोरे, हरिदास आदलिंगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून देण्यात आले. ट्रकचालक मन्नीवन रामन्ना (रा. तुरईकुडी, उमामहेश्वरम, तामिळनाडू) याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास सपोनि नागराज निंबाळे करीत आहेत.

Web Title: A truck collided with a truck near Mohall, one killed and nine injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.