मंगळवेढाजवळ अपघात; महाविद्यालयीन युवक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:40 PM2019-01-30T12:40:25+5:302019-01-30T12:43:51+5:30

मंगळवेढा : लोकमत न्युज नेटवर्क मंगळवेढा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या ...

Trouble near Mangaldevah; College youths killed, both injured | मंगळवेढाजवळ अपघात; महाविद्यालयीन युवक ठार, दोघे जखमी

मंगळवेढाजवळ अपघात; महाविद्यालयीन युवक ठार, दोघे जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देट्रक चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलअपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखलअपघातस्थळी पोलीस दाखल, पंचनामा करण्याचे काम सुरू

मंगळवेढा : लोकमत न्युज नेटवर्क
मंगळवेढा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. या धडकेत  महाविद्यालयात शिकणारा तरुण जागीच ठार झाला असून हा अपघात रात्री बाराच्या सुमारास घडला. राहुल शिवाजी कसगावडे (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. तर अमोल लक्ष्मण शिंदे (वय १८) व अशोक सीताराम सावंजी (वय १८) हे दोघे जखमी झाले आहेत.

मालट्रक (एम. एच. 13 सी एक्स 1670)  सोलापूरच्या दिशेने जात होता. हा मालट्रक महाविद्यालयाजवळ आला असताना दुचाकीवर मंगळवेढाकडे येत असलेल्या राहुल कसगावडे व अशोक सावंजी यांना ट्रकचालकाने समोरून धडक दिली. समोरुनच जोरदार धडक दिल्याने ट्रकमध्ये दुचाकी अडकली आणि ४०० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली.  तसेच पायी चालत येणाऱ्या अमोल शिंदे याला देखील ट्रकने जोराची धडक दिली. 


या अपघातात राहुल कसगावडे जागीच ठार झाला तर जखमी सावंजी व शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Trouble near Mangaldevah; College youths killed, both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.