सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; आयुक्तांची घोषणा

By Appasaheb.patil | Published: August 16, 2023 03:52 PM2023-08-16T15:52:19+5:302023-08-16T15:52:28+5:30

शहराच्या विकास आणि नागरी सुविधा पुरविण्यात महापालिकेचे सर्व अधिकारी - कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची आहे.

Three percent increase in dearness allowance of Solapur municipal employees; Declaration of the Commissioner | सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; आयुक्तांची घोषणा

सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ; आयुक्तांची घोषणा

googlenewsNext

सोलापूर : शहराच्या विकास आणि नागरी सुविधा पुरविण्यात महापालिकेचे सर्व अधिकारी - कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. यामुळे त्यांच्या पदोन्नत्या, आकृतीबंध यासह विविध चांगले निर्णय घेण्यात आले आहेत असून यानिमित्ताने महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची घोषणा आयुक्त शितल तेली-उगले यांनी केली.

सोलापूर महापालिकेच्या वतीने तसेच स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. यामुळे सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. यापुढेही सोलापूर शहराचा चौफेर विकास करण्यासाठी निष्ठेने प्रयत्न करण्यात येतील असेही आयुक्तांनी सांगितले. याचवेळी महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्काराने १७ जणांना सन्मानित करण्यात आले.

यात सहाय्यक अभियंता दीपक पवार, शिपाई कुमार चव्हाण, कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल, आरोग्य निरीक्षक सतीश पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, झाडूवाली रमाबाई साबळे, रेषाबाई मोरे, लिपिक दिलीप वाघमारे, मजूर अंबादास जुमिनळे, लिपिक यल्लाप्पा कुंभार, मुकादम सोमशेखर पवार, एमआयएस तज्ञ नागनाथ पदमगोंडे, लिपिक शबीरपाशा इनामदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता देगावकर, मिडवाइफ संगीता माने, लिपिक गुरुसिद्धप्पा दबडे, आया तारा झंपले आदींचा यावेळी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Web Title: Three percent increase in dearness allowance of Solapur municipal employees; Declaration of the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.