सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:42 AM2019-03-18T11:42:47+5:302019-03-18T11:45:55+5:30

महेश कुलकर्णी  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियान राबविण्यात आले आहे. ...

Subhash Deshmukh alone 'watchman' in Solapur! | सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ !

सोलापुरात सुभाष देशमुख एकटेच ‘चौकीदार’ !

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाच्या अभियानात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा सहभाग नाहीलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियानसुभाष देशमुख यांनीच टिष्ट्वटरवर ‘चौकीदार सुभाष देशमुख’ असे नाव बदलले

महेश कुलकर्णी 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सोशल मीडियावर ‘मंै भी चौकीदार’ हे नवे अभियान राबविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिष्ट्वटर हँडलवरील नावात बदल करून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असं केलं आहे. त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांचं अनुकरण केलं आहे. महाराष्टÑाच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही हँडलवरील नाव बदलले आहे. सोलापुरात भाजपाचे दोन मंत्री आणि एक खासदार  आहेत. यापैकी केवळ सुभाष देशमुख यांनीच टिष्ट्वटरवर ‘चौकीदार सुभाष देशमुख’ असे नाव बदलले आहे.

पश्चिम महाराष्टÑातून भाजपाला पहिला खासदार देणारे शहर म्हणून सोलापूरला ओळखले जाते. सध्या सोलापुरात सर्वच प्रमुख ठिकाणी भाजपा सत्तेत आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता आहे.

 जिल्हा परिषदेत भाजपा आघाडीची सत्ता आहे. याचबरोबर सोलापूरचा खासदार आणि दोन मंत्री अशा प्रमुख सत्ताकेंद्रावर भाजपाची पकड आहे. 

काँग्रेसने सोशल मीडियात ‘चौकीदार चोर है’ असं कॅम्पेन उघडलं होतं, याच कॅम्पेनला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून ‘मैं भी चौकीदार’ या कॅम्पेनची सोशल मीडियात सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिष्ट्वटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. त्याचपाठोपाठ भाजपाच्या केंद्र आणि महाराष्टÑ सरकारातील अनेक मंत्र्यांनी,  मोठ्या नेत्यांनीदेखील टिष्ट्वटरवरील नाव बदलले आहे. 

मोदी यांच्यानंतर भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ‘चौकीदार’ अभियानात सहभागी होण्याच्या  सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर सोलापुरात केवळ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीच टिष्ट्वटर हँडलवरील नावात बदल केला आहे. खासदार शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह सोलापुरातून भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले अमर साबळे यांनीही टिष्ट्वटरवरील  नावात बदल केला नाही. 

काय आहे ‘चौकीदार’ अभियान ?
- राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेला उत्तर देण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वट केलं, त्यामध्ये मोदी म्हणाले की, मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे. पण मी एकटा चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असं म्हणत मैं भी चौकीदार ही मोहीम टिष्ट्वटरवर सुरु केली आहे. 

या प्रमुखांचा अभियानात नाही सहभाग

  • - पालकमंत्री विजयकुमार देशमुख
  • - खासदार शरद बनसोडे
  • - खासदार अमर साबळे
  • - अविनाश महागावकर
  • - महापौर शोभा बनशेट्टी
  • - जिल्हाध्यक्ष शहाजी पवार
  • - शहराध्यक्ष अशोक निंबर्गी

Web Title: Subhash Deshmukh alone 'watchman' in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.