महाराष्ट्र हे दारूड्यांचे राज्य : संभाजीराव भिडे गुरूजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:03 PM2018-05-09T19:03:28+5:302018-05-09T19:03:28+5:30

अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावर होणार होत आहे़

State of Maharashtra: Samajgirao Bhide Guruji | महाराष्ट्र हे दारूड्यांचे राज्य : संभाजीराव भिडे गुरूजी

महाराष्ट्र हे दारूड्यांचे राज्य : संभाजीराव भिडे गुरूजी

googlenewsNext

सोलापूर : देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक दारू विकली जाते़ महाराष्ट्र हे दारूड्यांचे राज्य आहे असा घणाघाती टिका श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केली़

अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठाच्या मैदानावर होणार होत आहे़ पुढे बोलताना भिडे गुरूजी म्हणाले की, शिवजयंती महाराजाचे  जयंती उत्सव साजरे केले जातात मात्र शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्ते फक्त सत्तास्थापनेसाठी करीत आहेत़  

दरम्यान, गायची हत्या केल्यावर त्याला देहनातची सजा दे म्हणणारा एकही आमदार नाही हे महाराष्ट्राचे दुदैव़ देशातील सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात होत आहेत़ मला अटक करा म्हणून आंदोलन करणाºयांनी बलात्कारांविरोधात आंदोलन करावीत़

दुर्गराज किल्ले रायगडावर होणाºया ३२ मण सुवर्ण सिंहासन उपक्रमाविषयी ते सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. दुर्गराज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी बसविण्यात आलेले ३२ मणाचे सुवर्ण सिंहासन पुन्हा बसविण्याचा संकल्प देशभरातील तमाम शिवभक्तांनी ४ जून २०१७ रोजी किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या संकल्प सोहळ्यात केला आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत संभाजीराव भिडे गुरुजी मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरात आले आहेत़ 

Web Title: State of Maharashtra: Samajgirao Bhide Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.