सोलापूरात राष्ट्रवादीचे तोंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:14 PM2018-10-02T16:14:40+5:302018-10-02T16:18:59+5:30

In the Solapur, the Nationalist Congress Party's black bars were built and monolithic protest movement | सोलापूरात राष्ट्रवादीचे तोंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन 

सोलापूरात राष्ट्रवादीचे तोंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन 

Next
ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सरकारच्या धोरणांचा निषेधराष्ट्रवादीच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचाही पाठिंबाराष्ट्रगीताने अभिवादन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवारी सकाळी गांधी जयंतीचे औचित्य साधून रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला आणि दंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साळुंखे - पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, माजी आमदार  युनूसभाई शेख, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, गटनेते किसन जाधव यांच्यासह युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू कुरेशी, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, महिला आघाडी शहराध्यक्ष नगरसेविका सुनीता रोटे, महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे, राजन जाधव, पद्माकर काळे, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, मल्लेश बडगु, बशीर शेख, सुहास कदम, विष्णू निकंबे, ज्ञानेश्वर सपाटे, दिलावर मणियार ,गोवर्धन सुंचू , राजेश अच्युगटला , संतोष कासे,तणवीर गुलजार, अमीर शेख,शाम गांगर्डे, प्रकाश जाधव, संजय सरवदे, डॉ. दादाराव रोटे, महंमद इंडीकर, अ‍ॅड ,सादिक नदाफ , लक्ष्मण भोसले,रमीज कारभारी,प्रसाद कलागते ,केरप्पा जंगम,जनार्दन बोराडे, युनूस मुर्शद, विजय भोईटे, लक्ष्मण जगताप, मारुती जंगम, हेमंत चौधरी, गणेश पाटील, प्रशांत बाबर, वंदना भिसे, शोभा गायकवाड, सुनीता गायकवाड, मार्था आसादे, सिया मुलानी, गौरा कोरे, सुनंदा साळुंखे, राठोड, मनीषा नलावडे, सोपान खांडेकर, मौला शेख, महेश कुलकर्णी, मैनु इनामदार, प्रवीण कारमपुरी, मुस्ताक पटेल, सुनील जाधव,अनिल उकरंडे, संगीता मोरे, मानसी बापटीवाले, छाया जगदाळे,रुपेश भोसले,अहमद मासूलदार,फारूक मटके,प्रवीण साबळे,अ‍ॅड. विकास जाधव, संजय मोरे,पांडुरंग आवाल,बंदेनवाज कोरबू,स्वामीनाथ पोतदार,सुधीर भोसले, गुलाब मुलानी, विजय काळे, सचिन कदम, अख्तरताज पाटील,विलास चेळेकर, भारत सोरेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

आंदोलनाच्या प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. राष्ट्रगीताने अभिवादन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सत्य, अहिंसा आणि शांती राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची तत्वे. राष्ट्रवादीने मात्र सत्य ऐवजी असत्य अर्थात ( राफेल विमाने बनविण्याची ऌअछ कंपनीची क्षमता नाही ),अहिंसा ऐवजी हिंसा अर्थात (विचारवंतांच्या हत्येस जबाबदार सनातन संस्थेवर अद्याप बंदी नाही ) आणि शांती ऐवजी अशांती अर्थात देशाच्या संविधानाचा अपमान करणाºयांना तत्काळ अटक करण्यात यावी हा मजकूर फलकावर लिहून सत्ताधारी पक्षाची आज हि तत्वे असल्याचे सांगत सरकारच्या कारभाराची सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाषणातून चिरफाड केली. 

काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा ----
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरणे आंदोलनात  काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर अलका राठोड आदींनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून राष्ट्रवादीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. 

Web Title: In the Solapur, the Nationalist Congress Party's black bars were built and monolithic protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.