विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:20 PM2019-03-01T17:20:24+5:302019-03-01T17:22:41+5:30

होय...नगरची जागा काँग्रेसलाच

Sharad Pawar to send Vijayadas to Rajya Sabha | विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार : शरद पवार

विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार : शरद पवार

googlenewsNext
ठळक मुद्दे- शरद पवार सोलापूर जिल्हा दौºयावर- करमाळा, अकलूजमधील विविध कार्यक्रमांना शरद पवारांनी लावली हजेरी- माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत केली चर्चा

अकलूज (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागेवर निवडणूक लढवू पाहणारे शरद पवार प्रथमच विजयदादांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत स्पष्टपणे बोलले़ ‘विजयदादांचे पुनर्वसन कसे करणार?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, ‘माझ्या जागेवर विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार’.

अकलूज येथे शुक्रवारी मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते़ यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते पत्रकारांशी ते बोलत होते़ ‘नगरची जागा काँग्रेसला सोडणार का?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले़ होय. क़ाँग्रेसला सोडणाऱ त्यानंतर त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावरही सडकून टीका केली.



 

Web Title: Sharad Pawar to send Vijayadas to Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.