A seventeen-year-old boy drowned in Mohol, drowned in water | मोहोळ येथे सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
मोहोळ येथे सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

ठळक मुद्देधोकादायक कपारीचा मार लागल्याने तो मयत झाल्याची दुर्घटना पाण्यावर तरंगणारे प्रेत बाहेर काढुन त्यांचा पंचनामा करण्यात आला़

मोहोळ : श्री नागनाथ यात्रेनिमीत्त खर्गतिर्थावर पोहण्यास गेलेल्या सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना ता. १९ रोजी पहाटेच्या  दरम्यान घडली.

 याबाबत मोहोळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार युवराज सुनील कुंभार (वय १७ रा. कुंभार गल्ली मोहोळ) हा मोहोळ येथील यात्रेनिमीत्त खर्ग तिर्थात पोहण्यास गेला होता़ त्यावेळी खर्गतिथार्तील धोकादायक कपारीचा मार लागल्याने तो मयत झाल्याची दुर्घटना घडली. सायंकाळी सातच्या सुमारास त्याचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसल्याने काही नागरिकांनी पोलीसांशी संपर्क साधुन सदर घटनेची माहीती दिली. त्यावरून पाण्यावर तरंगणारे प्रेत बाहेर काढुन त्यांचा पंचनामा करण्यात आला़

या प्रकरणी युवराज चे वडील सुनील कुंभार यांनी पोलीसात खबर दिली आहे़ या पुवीही या खर्गतिर्थावर पोहायला गेल्यानंतर धोकादायक कपारीचा डोक्याला मार लागुन मयत झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्वरीत या खर्ग तिर्थावरील धोकादायक कपारी बुझविण्यात याव्या अशी मागणी नागरिकातुन होत आहे़


Web Title: A seventeen-year-old boy drowned in Mohol, drowned in water
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.