सेंट्रिंग कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून; क्रिकेट खेळून निघालेल्या मुलांना दिसला मृतदेह

By काशिनाथ वाघमारे | Published: June 19, 2023 09:10 PM2023-06-19T21:10:06+5:302023-06-19T21:10:11+5:30

सांगोल्यातील घटना : मुलीकडून पटली मृताची ओळख 

Sentry worker killed in Solapur; The dead body was seen by the children who were playing cricket | सेंट्रिंग कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून; क्रिकेट खेळून निघालेल्या मुलांना दिसला मृतदेह

सेंट्रिंग कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून; क्रिकेट खेळून निघालेल्या मुलांना दिसला मृतदेह

googlenewsNext

सोलापूर  : सेंट्रिंगच्या कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह फरफटत नेऊन रस्त्याच्या कडेला टाकून दिला. क्रिकेट खेळून निघालेल्या मुलांना मृतदेह दिसताच पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली अन् तपासाची चक्रे फिरली.

संतोष जगन्नाथ साळुंखे (वय ४५, रा. कमळ मळा, माळशिरस) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष हा सध्या सांगोल्यात राहात होता.  ही घटना सोमवार, १९ जून रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास सांगोला रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला बाह्य वळणावर मिरज रेल्वे गेट - वंदे मातरम् चौक दरम्यान माळवाडी येथे उघडकीस आली.

याबाबत मृत संतोषची मुलगी अश्विनी संदेश निकम (रा. वाटंबरे, ता. सांगोला) हिने फिर्याद दिली आहे. दरम्यान मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगोला येथील मुकादम शाहिद मुलाणी यांच्याकडे संतोष साळुंखे हा सेंट्रिंगचे काम करीत होता. रविवार, १८ जून रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुकादम शाहिद मुलाणी यांच्याकडून मजुरीचे दीड हजार रुपये घेऊन गेला. त्यानंतर त्या दोघांची भेट झाली नाही. रविवारी मध्यरात्री संतोष साळुंखे याच्या डोक्यात अनोळखी व्यक्तीने दगड घालून खून केला.

दरम्यान सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास सांगोला शहरातील तरुण मुले क्रिकेट खेळून त्याच बायपास रोडने घराकडे येत असताना रस्त्यालगत मृतदेह पडलेला दिसून आला. त्यांनी पोलिस नाईक आप्पासाहेब पवार यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत कुमार काटकर हे घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Sentry worker killed in Solapur; The dead body was seen by the children who were playing cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.