Sangola's city shrouded in a mysterious voice, citizens scared, inquired from one another! | सांगोला शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिक भयभीत, एकमेकांकडे चौकशी सुरू !
सांगोला शहर गूढ आवाजाने हादरले, नागरिक भयभीत, एकमेकांकडे चौकशी सुरू !

ठळक मुद्देआवाजाच्या तीव्रतेमुळे सिमेंट व पत्र्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्या, काचा, रस्त्यावरील वाहने, कार्यालयातील साहित्य हादरून गेलेआवाजाच्या तीव्रतेमुळे शहर व तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजतेकोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि १६ : शहर व तालुका  गूढ आवाजामुळे हादरून गेला. हा आवाज इतका मोठा होता की, आवाजामुळे सिमेंट, धाब्याच्या, पत्राच्या घरांतील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्यांच्या काचा हादरल्यामुळे जो तो घराच्या बाहेर येऊन कशाचा आवाजा झाला, याविषयी घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांकडे चौकशी करू लागला. 
दु. ३ वाजून ११ मि. अचानक धुडूंब... असा मोठा गूढ आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. जो तो घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन आवाज कशाचा झाला, कोठे भूकंप की विमान पडले की भूगर्भातून आवाज आला असे वेगवेगळे अर्थ लावून चर्चा करू लागले. 
शहरातील लोक ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातील लोक शहरातील मित्रपरिवार, नातेवाईकांना मोबाईलवरून संपर्क साधत आवाज कशाचा झाला, कोठून झाला, अशी चौकशी करू लागले. आवाजाच्या तीव्रतेमुळे सिमेंट व पत्र्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, दारे, खिडक्या, काचा, रस्त्यावरील वाहने, कार्यालयातील साहित्य हादरून गेले. आवाजाच्या तीव्रतेमुळे शहर व तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते.
नेमका आवाज कशाचा झाला, कोठून आला या निकषापर्यंत कोणालाही पोहोचता आले नाही. आवाजाविषयी प्रशासनाकडे चौकशी केली असता नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवून काय आवाज झाला का? आम्हाला माहीत नाही, माहिती घेऊन सांगतो , अशी समर्पक उत्तरे देऊन हात झटकले. 
-----------------
सांगोल्यात गूढ आवाज झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आवाजामुळे कोणतीही वित्त अगर जीवितहानी झाली नाही. या आवाजासंदर्भात मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी यांना चौकशी करण्यास सांगितले असून, मीही या आवाजाविषयी माहिती घेत आहे.
- संजय पाटील
तहसीलदार


Web Title: Sangola's city shrouded in a mysterious voice, citizens scared, inquired from one another!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

सोलापूर अधिक बातम्या

पुलवामा घटनेच्या निषेर्धात कुर्डुवाडी शहर कडकडीत बंद

पुलवामा घटनेच्या निषेर्धात कुर्डुवाडी शहर कडकडीत बंद

3 hours ago

मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद

मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद

22 hours ago

अपंग चैतन्यसह तिघांनी फडकविला साडेबारा हजार फुटांवर तिरंगा ध्वज

अपंग चैतन्यसह तिघांनी फडकविला साडेबारा हजार फुटांवर तिरंगा ध्वज

22 hours ago

लक्ष दीपोत्सवाने उजळला सोलापुरातील अव्ववरु मठाचा परिसर 

लक्ष दीपोत्सवाने उजळला सोलापुरातील अव्ववरु मठाचा परिसर 

23 hours ago

मजुरीत ५० टक्के वाढ न दिल्यास सोलापुरातील यंत्रमाग बंद; ‘लालबावटा’चा निर्णय 

मजुरीत ५० टक्के वाढ न दिल्यास सोलापुरातील यंत्रमाग बंद; ‘लालबावटा’चा निर्णय 

23 hours ago

सोलापुरातील मार्केट यार्डजवळ हायवे वाजवतोय धोक्याची घंटा !

सोलापुरातील मार्केट यार्डजवळ हायवे वाजवतोय धोक्याची घंटा !

23 hours ago