सोलापुरातील श्रमिकांची साधू वासवानी बाग बनलीय दारूचा अड्डा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 08:15 PM2019-03-27T20:15:08+5:302019-03-27T20:17:35+5:30

श्रमिकांसाठी निर्माण केलेल्या गुरुनानक चौकातील साधू वासवानी बाग सर्वसामान्यांसाठी कमी आणि गोंधळ घालणाºयांसाठी जास्त ठरली आहे.

Sadhu Vaswani Bagh, a liquor shop for workers of Solapur! | सोलापुरातील श्रमिकांची साधू वासवानी बाग बनलीय दारूचा अड्डा !

सोलापुरातील श्रमिकांची साधू वासवानी बाग बनलीय दारूचा अड्डा !

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी केवळ मोकळे मैदान होते. महापालिका आणि या परिसरातील नगरसेवकांच्या प्रयत्नातून बागेच्या सुशोभीकरणाचे काम झाले.या बागेला एका बाजूला तारेचे कंपाउंड नसल्याने ही बाग म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती झाली आहे.

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : श्रमिकांसाठी निर्माण केलेल्या गुरुनानक चौकातील साधू वासवानी बाग सर्वसामान्यांसाठी कमी आणि गोंधळ घालणाºयांसाठी जास्त ठरली आहे़ फुटकळ मद्यपींसाठी तर हा दारूचा अड्डा बनला आहे़ सध्या या बागेला पाणीपुरवठाही होत नसल्याने हिरवळ नाहीशी झाली आहे. वाळलेल्या गवतावर पत्ते खेळणारे दिसतात. या बागेला एका बाजूला तारेचे कंपाउंड नसल्याने ही बाग म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी सुधारणा केलेल्या बागेची अवस्था आता बदलली आहे़ बाग कसली वाळलेले गवतच दिसते़ बागेच्या तिन्ही बाजूने दुकान-टपºयांनी वेढले आहे़ काही टपºयांचा मागचा दरवाजा या बागेतच केला गेला आहे़ प्रवेशद्वाराच्या कोपºयाला असलेल्या पत्र्याच्या खोलीजवळ बसून दुपारचा मिनीबार भरलेला असतो़ कोणी एकटाच मद्य प्राशन करीत बसलेला असतो तर कुठे तीन - चारजण एकत्र येऊन मद्य घेत बसल्याचेही दिसून आले. या बागेत सर्वसामान्यांपेक्षा उपद्रवी आणि अशांतता माजवणाºया लोकांची गर्दी सर्वाधिक दिसून येते.

दोन वर्षांपूर्वी केवळ मोकळे मैदान होते. महापालिका आणि या परिसरातील नगरसेवकांच्या प्रयत्नातून बागेच्या सुशोभीकरणाचे काम झाले. विविध झाडी लावण्यात आली़ आता या बागेत केवळ फिवळी फुले लगडलेले वृक्ष दिसते तर दुसरीकडे काही जुनी झाडे वाळत चाललेल्या अवस्थेत दिसतात़ सकाळी ११ वाजता भरलेला गोंधळ हा सायंकाळी ७ नंतर थांबलेला दिसून येतो़ या बागेत प्रवेशद्वाराच्या कोपºयाला केवळ तारेचे कं पाउंड बांधून ठेवले आहे़ त्यात ना गवत, ना खेळणी साहित्य़ त्यामुळे या बागेत खºया अर्थाने काहीच नाही म्हणून कुणीही येत नाहीत़ या बागेच्या प्रवेशद्वारावरचा रस्ताही पाण्याच्या टँकर वाहतुकीमुळे खूप खराब झालेला दिसून येतोय़ समस्यात अडक लेल्या बागेला नवे रुप लाभून देण्याची मागणी आहे.

तारेचे कंपाउंड अर्धवट 
- ही बाग तशी जुनी आहे़ शास्त्रीनगर, सिंधी कॉलनी, कुमठा नाका, केशवनगर या परिसरातील नागरिकांसाठी म्हणून ही बाग ओळखली जायची़ आता या बागेने ओळखच बदलली आहे़ ‘मद्यपींची बाग’ अशी वेगळी ओळख या बागेने निर्माण केलीय़ त्यामुळे खºया अर्थाने सर्वसामान्य या बागेत दिसत नाहीत़ बागेच्या प्रवेशद्वाराभोवती संरक्षक भिंत आहे, मात्र तिच्या विरुद्ध दिशेला लोखंडी पोल दिसतात पण तारा बांधल्या नाहीत़ त्यामुळे गुरुनानक चौकातून कोणीही, कधीही, कुठूनही प्रवेश करतो.

लहान मुलांच्या तोंडी शिव्यांची लाखोलीच
- या बागेत बोटावर मोजण्याइतके मजूर, काही वृद्ध दुपारी बागेत येतात़ ते पहुडताच लहान मुलांचा गलका सुरु असतो़ क्रिकेट खेळणाºया मुलांमध्ये वादविवाद रंगतो़ त्याही पुढे जाऊन त्यांच्या तोंडी पाच मिनिटात अनेकदा आई-बहिणींचा उद्धार होताना ऐकायला मिळतो़ कधी-कधी ही लहान मुले अंगावर जाण्याचाही प्रसंग पाहायला मिळतो़ वयस्कर लोक हटकले की थोडावेळ शांतता आणि पुन्हा तोच प्रकार पाहायला मिळतो.

जिक डे तिकडे बाटल्याच
- बागेच्या कोणत्याही कोपºयाला जाल तर तिथे कचरा आणि त्यामध्ये पडलेल्या दारुच्या बाटल्या, फुटलेल्या बाटल्या, रिकाम्या बिसलरी बाटल्या आणि मद्यपान केलेले प्लास्टिकचे ग्लास दिसतील़ याबरोबरच बटाटा वेपर्सचे रॅपर, विडी-सिगारेटचे थोक डे, काडीपेटी, कॅरीबॅग असे विविध साहित्य दिसेल़ या बागेत स्वच्छता होताना दिसून येत नाही़ पूर्वी सायंकाळी गवतावर पाणी मारताना माळी दिसायचा़ अलिकडे तोही दिसत नाही़

Web Title: Sadhu Vaswani Bagh, a liquor shop for workers of Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.