माहिती अधिकाराच्या शस्त्राने हळदुगेंच्या पोपट नलावडेंनी ठेवले अख्खे गाव धाकात, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 07:46 PM2017-12-21T19:46:19+5:302017-12-21T19:50:32+5:30

माहितीच्या अधिकाराखाली दररोज गावात कुणाला ला कुणाला धमक्या देण्याची सवय असलेला हळदुगे (ता. बार्शी) येथील पोपट शामराव नलावडे हा ६७ वर्षीय निरक्षर इसम बुधवारी भर न्यायालयात कुºहाड घेऊन आल्याने अख्खे न्यायालय हादरून गेले.

With the right to information, Haldudunga parrot Nawaladenni has kept all the villages, types of Solapur district! | माहिती अधिकाराच्या शस्त्राने हळदुगेंच्या पोपट नलावडेंनी ठेवले अख्खे गाव धाकात, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार !

माहिती अधिकाराच्या शस्त्राने हळदुगेंच्या पोपट नलावडेंनी ठेवले अख्खे गाव धाकात, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार !

Next
ठळक मुद्देशरीराने दणकट असलेल्या पोपट नलावडेने भर न्यायालयात कुºहाड दाखवल्याने अनेकांना धडकीलिहिता वाचता येत नाही असे निरक्षर लोकही माहिती अधिकाराच्या नावाखाली धमक्या देऊ लागल्याचे चित्रतात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशीही याने हमरी तुमरीची भाषा केली होती


बाळासाहेब बोचरे
सोलापूर दि २१ : समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनतेला माहितीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून धरणे अािण उपोषण केले . माहितीच्या अधिकाराचा आज काही साक्षर लोक दुरूपयोग करतात हे जरी खरे असले तरी ज्याला लिहिता वाचता येत नाही असे निरक्षर लोकही माहिती अधिकाराच्या नावाखाली धमक्या देऊ लागल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकाराखाली दररोज गावात कुणाला ला कुणाला धमक्या देण्याची सवय असलेला हळदुगे (ता. बार्शी) येथील पोपट शामराव नलावडे हा ६७ वर्षीय निरक्षर इसम बुधवारी भर न्यायालयात कुºहाड घेऊन आल्याने अख्खे न्यायालय हादरून गेले.
वय झाले तरी शरीराने दणकट असलेल्या पोपट नलावडेने भर न्यायालयात कुºहाड दाखवल्याने अनेकांना धडकी भरली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या गावी जावून अनेकांकडे चौकशी केली असता त्याने धमकी देण्यासाठी गावातल्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पत्रकार यापैकी कोणालाच सोडले नसल्याचे समजले. सगळ्यानाच तो माहिती अधिकाराची धमकी देत असतो. या निरक्षर माणसाला माहिती अधिकाराचे महत्व कसे कळले आणि मिळालेली माहिती वाचता तरी येते की नाही हा मुद्दा बाजुला असला तरी त्याचा शस्त्र म्हणून तो मोठ्या खुबीने वापर करतो. एक विक्षिप्त माणूस अशीच याची गावात वल्गणा केली जाते. त्याच्या वाटेला कोणी जात नाही. याला दोन मुले आणि एक मुलगी असून सर्वजण विवाहित आहेत. याच्याजवळ फक्त याची पत्नी असून ती मोलमजुरी करते. कायम हातात कुºहाड, काठी , कोयता असे कोणतेही शस्त्र बाळगणे, आणि कोणत्याही कारणास्तव धमक्या देणे, धडा शिकवण्याची भाषा करणे अशी त्याला सवयच आहे. मात्र अद्याप त्याने कोणावरही हल्ला केला नाही. गावकरीच त्याच्यापासून चार हात दूर राहतात. पाच- सहा वर्षापूर्वी त्याने बार्शी न्यायालयातही कुºहाड दाखवल्याने त्याला दोन वेळा तीन महिन्याची सजा झाली होती. लोकशाही दिनामध्ये तात्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशीही याने हमरी तुमरीची भाषा केली होती. 
-----------
एक खटला असाही....
गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीशेजारी विहीर घेण्यास शेतकºयांना बंदी असते. तरीही पोपट नलावडेने विहीर पाडल्याने ग्रामपंचायतीने त्याची विहीर बुजवली आणि मोटार जप्त केली. त्याविरुध्द त्याने दावा केला आहे. आता मला नुकसान भरपाई मिळणार या स्वप्नात तो असून त्यासाठी स्वत:ची १२ एकर जमीन पडीक ठेवली आहे. 

निरक्षर पोपट नलवडेला कळले माहिती अधिकाराचे मर्म
 

Web Title: With the right to information, Haldudunga parrot Nawaladenni has kept all the villages, types of Solapur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.