सोलापूर जिल्ह्यातील रिक्त ६६ गावांसाठी नव्याने पोलीस पाटील भरती, बार्शी व उत्तरची गावे, हंगामी नियुक्तीच्या २९ गावांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:41 AM2018-01-29T11:41:30+5:302018-01-29T11:45:03+5:30

हंगामी व रिक्त असलेल्या ६६ गावांच्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार असून, मागील महिन्यात काढलेल्या आरक्षण सोडतीनुसारच ही पदे भरली जातील, असे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.

Recruitment of new police Patil for vacant 66 villages in Solapur district, Barshi and North villages, 29 villages of seasonal appointments | सोलापूर जिल्ह्यातील रिक्त ६६ गावांसाठी नव्याने पोलीस पाटील भरती, बार्शी व उत्तरची गावे, हंगामी नियुक्तीच्या २९ गावांचाही समावेश

सोलापूर जिल्ह्यातील रिक्त ६६ गावांसाठी नव्याने पोलीस पाटील भरती, बार्शी व उत्तरची गावे, हंगामी नियुक्तीच्या २९ गावांचाही समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर प्रांताधिकारी अंतर्गत बार्शी व उत्तर तालुक्यात १६६ पोलीस पाटील पदे आहेतआरक्षणानुसार पोलीस पाटील पदांची नियुक्ती केली जाते. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला आहेएखाद्या गावात आरक्षणातील व्यक्ती नसेल तर तीन वेळा भरती प्रक्रिया राबवून आरक्षण बदलण्यात येईल : शिवाजी जगताप


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ : हंगामी व रिक्त असलेल्या ६६ गावांच्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार असून, मागील महिन्यात काढलेल्या आरक्षण सोडतीनुसारच ही पदे भरली जातील, असे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.
सोलापूर प्रांताधिकारी अंतर्गत बार्शी व उत्तर तालुक्यात १६६ पोलीस पाटील पदे आहेत. यापैकी रिक्त असलेल्या ६६ गावांतील पोलीस पाटील पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर तालुक्यातील बीबीदारफळ, नरोटेवाडी, रानमसले, अकोलेकाटी, शिवणी, एकरुख तसेच मार्डी तर बार्शी तालुक्यातील रुई, सर्जापूर, सासुरे, बोरगाव(झा.), पिंपरी, झाडी, कांदलगाव, नारीवाडी, ढोराळे, हत्तीज, पिंपळगाव (ढा़), दहिटणे, दडशिंगे, इंदापूर, मळेगाव, रऊळगाव, घाणेगाव, तांबेवाडी, भातंबरे, कोरफळे, वाणेवाडी व यावली या गावांत हंगामी पोलीस पाटील पदे आहेत. मागील महिन्यात नव्याने काढलेल्या आरक्षणानुसार पोलीस पाटील पदाची भरती करण्यात आली होती, मात्र यामध्ये हंगामी पद असलेली गावे वगळली होती. आता नव्याने राबविल्या जाणाºया भरती प्रक्रियेत या गावांत पदे भरण्यात येणार आहेत. 
डिसेंबरमध्ये राबविलेल्या भरतीवेळी रिक्त राहिलेल्या ३७ पैकी उत्तरच्या १० व बार्शीच्या २७ गावांत पोलीस पाटील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये हगलूर, तळेहिप्परगा, खेड, नंदूर, वडाळा, कळमण, मोहितेवाडी, पाथरी, हिरज, राळेरास(उत्तर तालुका) तसेच कारी, निंबळक, शेंद्री, पानगाव, शेलगाव(मा़), तडवळे, उंडेगाव, इर्ले, इर्लेवाडी, ढेंबरेवाडी, जहानपूर, सौंदरे, भोयरे, बळेवाडी, नागोबाचीवाडी, लक्ष्याचीवाडी, भोर्इंजे, बाभुळगाव, धामणगाव(आ़), पिंपळगाव(धस), हिंगणी(आऱ), मालेगाव, अंबाबाईचीवाडी, मिर्झनपूर, भांडेगाव, पिंपरी(आर) व महागाव या गावांचा समावेश आहे. 

----------------------
काही गेले मॅटमध्ये 
गावडीदारफळ हंगामी पोलीस पाटील गावात राहत नाहीत, असे पत्र ग्रामपंचायत व मंडल अधिकाºयांनी दिल्याने तेथे भरती प्रक्रिया राबविली होती. परंतु हंगामी पोलीस पाटील अभिमन्यू वाघमारे यांनी आधारकार्ड अन्य कागदपत्रे, रहिवासी पुरावा देऊन मॅटमध्ये अपील केले आहे. याशिवाय अन्य काही गावांतील हंगामी पाटील मॅटमध्ये गेले आहेत. 
----------------
आरक्षणानुसार पोलीस पाटील पदांची नियुक्ती केली जाते. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला आहे. सध्या एखाद्या गावात आरक्षणातील व्यक्ती नसेल तर तीन वेळा भरती प्रक्रिया राबवून आरक्षण बदलण्यात येईल. 
- शिवाजी जगताप
प्रांताधिकारी सोलापूर 

Web Title: Recruitment of new police Patil for vacant 66 villages in Solapur district, Barshi and North villages, 29 villages of seasonal appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.