आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीकडून पतीला कोयत्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:32 PM2019-03-06T12:32:15+5:302019-03-06T12:33:15+5:30

वैराग: आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला वैरण तोडण्याच्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात ...

On the reason of water asking for water, the husband assaulted her husband | आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीकडून पतीला कोयत्याने मारहाण

आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीकडून पतीला कोयत्याने मारहाण

Next
ठळक मुद्देआंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला वैरण तोडण्याच्या कोयत्याने मारहाणवैराग पोलिसांत पत्नी व मुलगा या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला

वैराग: आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला वैरण तोडण्याच्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घडली. 

वैराग पोलिसांत पत्नी व मुलगा या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पती प्रकाश नरसिंग प्रबळकर (रा. पंचशीलनगर, वैराग) याने आंघोळीसाठी गरम पाणी बाथरूममध्ये घेतले होते. पाणी जास्त गरम असल्याने त्याने पत्नी रतन हिला गार पाणी मागितले. त्याचा राग मनात धरून पत्नीने शिवीगाळ करून वैरण तोडण्याच्या कोयत्याने डाव्या हातावर मारून जखमी केले. त्यावेळी मुलगा धनराज घरातून पळत आला व तुझा हा नेहमीचाच त्रास आहे, असे म्हणून जोराने छातीवर लाथ मारली. शिवीगाळ करून दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. 

यामध्ये प्रकाश यांच्या हात, पाठीस, डोकीस मार लागल्याची फिर्याद पत्नी व मुलाविरोधात वैराग पोलिसात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार गोपाळ घोळवे हे करीत आहेत.

Web Title: On the reason of water asking for water, the husband assaulted her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.