सोलापूर जिल्ह्यात ३.३४ लाख  बालकांना पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:16 AM2018-03-12T11:16:33+5:302018-03-12T11:16:33+5:30

 पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी, ग्रामीण भागात २४१०, नागरी भागात २१० लसीकरण केंद्रांद्वारे लस

Polio dose to 3.34 lakh children in Solapur district | सोलापूर जिल्ह्यात ३.३४ लाख  बालकांना पोलिओ डोस

सोलापूर जिल्ह्यात ३.३४ लाख  बालकांना पोलिओ डोस

Next
ठळक मुद्देग्रामीण व नागरी भागातील ५ वर्षांखालील एकूण ३ लाख ६२ हजार ४३६ बालके सोलापूर जिल्ह्यात ९२.२१ टक्के (३,३४,२०२) बालकांना ही लस पाजण्यात आली

सोलापूर : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाºया राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार २०२ बालकांना पल्स पोलिओची लस देण्यात आली. जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ शासकीय रुग्णालयात मान्यवरांच्या हस्ते बालकांना लस पाजून करण्यात आला. 

शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या बालकांना वैद्यकीय पथकाच्या कर्मचाºयांनी पोलिओची लस पाजली. याशिवाय वर्दळीच्या विविध ठिकाणी, मनपाच्या दवाखान्यातही ही मोहीम राबवण्यात आली. आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील मोहीम जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  राजेंद्र भारुड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, सहा. संचालक भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर यांनी बालकांना पोलिओची लस पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर यांची उपस्थिती होती.

सोलापूर जिल्ह्यासाठी पल्स पोलिओ मोहीम जिल्हाधिकारी डॉ.  राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत आहे. सदर मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरुन सहा. संचालक डॉ. भीमाशंकर जमादार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आले आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुधभाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रशासन अधिकारी आरिफ सय्यद, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, साथरोग अधिकारी डॉ. राजीव कुलकर्णी, सांख्यिकी अधिकारी अनिलकुमार जन्याराम, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख, जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. 

ग्रामीण भागात २४१०, नागरी भागात २१० लसीकरण केंद्रांद्वारे लस
- जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील ५ वर्षांखालील एकूण ३ लाख ६२ हजार ४३६ बालके असून, ग्रामीण भागात २४१० आणि नागरी भागात २१० लसीकरण केंदे्र, ९७ मोबाईल टीम, ट्रांझीट टीम स्थापन करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यात ९२.२१ टक्के (३,३४,२०२) बालकांना ही लस पाजण्यात आली. उर्वरित बालकांना १३ मार्च ते १५ मार्च या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी, वाड्यावस्त्यांवर, ऊसतोड, वीटभट्टी आदी ठिकाणी जाऊन लस पाजण्यात येणार आहे.

Web Title: Polio dose to 3.34 lakh children in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.