सोलापूरातील आंदोलक घंटागाडी कर्मचाºयांवर पोलीसांचा लाठीमार, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:59 AM2018-01-02T11:59:34+5:302018-01-02T12:00:55+5:30

आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला़ 

Police lathicharge on Solankar agitators, garbage staff, and tried to kill self-realization! | सोलापूरातील आंदोलक घंटागाडी कर्मचाºयांवर पोलीसांचा लाठीमार, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला !

सोलापूरातील आंदोलक घंटागाडी कर्मचाºयांवर पोलीसांचा लाठीमार, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला !

Next
ठळक मुद्देघंटागाडी कर्मचाºयांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाला कोणतेही कल्पना न देता काम बंद आंदोलन सुरू केलेघंटागाडी कर्मचाºयांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्याचा प्रस्ताव आयुक्त अविनाश ढाकणे यांनी तयार केला़घंटागाडी कर्मचाºयांचे मानधन सहा महिन्यांपासून थकले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला़ 
घंटागाडी कर्मचाºयांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाला कोणतेही कल्पना न देता काम बंद आंदोलन सुरू केले आहे़ त्यामुळे प्रशासनाने सोमवारी सकाळी कायम चालकांच्या मदतीने घंटागाड्या व आरसी बाहेर काढून शहरातील कचरा उचलण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांनी हातात दांडके घेऊन कर्मचाºयांना दमदाटी केली़ दहशती वातावरणामुळे कचरा गाड्या बाहेर निघू शकल्या नाहीत़ त्यामुळे मंगळवारी कचरा संकलन करण्यासाठी अप्पर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती़ ठरल्याप्रमाणे महानगरपालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला होता़ यावेळी श्रीशैल गायकवाड यांच्यासह घंटागाडी कर्मचारी महापालिकेत आले़ याचवेळी दोघांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलीसांनी आंदोलन कर्मचाºयांनी दादागिरी मोडीत काढण्यासाठी लाठीचार्ज केला़ आंदोलन करण्यासाठी एकत्र आलेले घंटागाडी कर्मचारी सैरावैरा पळत सुटले़ त्यावेळी पोलीसांनी पाठलाग करून लाठीचा प्रसाद दिला़ 
-------------------
काय आहे समस्या़....
घंटागाडी कर्मचाºयांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्याचा प्रस्ताव आयुक्त अविनाश ढाकणे यांनी तयार केला़ हा प्रस्ताव स्थायी समितीकडे प्रलंबित आहे़ त्यामुळे घंटागाडी कर्मचाºयांचे मानधन सहा महिन्यांपासून थकले आहे़ हा निर्णय झाल्यानंतर प्रत्येक कर्मचाºयांना मोठी रक्कम मिळणार आहे़ ही रक्कम तातडीने द्यावी म्हणून घंटागाडी कर्मचाºयांनी आडमुठी भूमिका घेतली आहे़ ऐन यात्रेच्या तोंडावर कचरा संकलन बंद केल्याने शहरात कचरा साठला आहे़ या कर्मचाºयांबाबत आता आयुक्त अविनाश ढाकणे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे़ 
 

Web Title: Police lathicharge on Solankar agitators, garbage staff, and tried to kill self-realization!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.