सोलापूर जिल्ह्यातून लोकसभेच्या रणामध्ये लढल्या फक्त आठ रणरागिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 02:45 PM2019-03-21T14:45:27+5:302019-03-21T14:52:54+5:30

रवींद्र देशमुख  सोलापूर : ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत महिलांना समाधानकारक प्रतिनिधीत्व देण्याचा सध्याचा काळ असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना संधी देण्याचे ...

Only eight Ranaragini fighters from the Solapur district contested the Lok Sabha elections | सोलापूर जिल्ह्यातून लोकसभेच्या रणामध्ये लढल्या फक्त आठ रणरागिणी

सोलापूर जिल्ह्यातून लोकसभेच्या रणामध्ये लढल्या फक्त आठ रणरागिणी

Next
ठळक मुद्देउज्ज्वलातार्इंना सर्वाधिक तीन लाखांवर; प्रभाताई झाडबुके यांना मिळाली होती ६५ हजार मतेलोकसभेच्या रिंगणात महिला उमेदवार नसतात हे खरं तर दुर्देवी - शोभा बनशेट्टीलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना जास्तीत जास्त आरक्षण असायला हवे - शोभा बनशेट्टी

रवींद्र देशमुख 

सोलापूर : ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत महिलांना समाधानकारक प्रतिनिधीत्व देण्याचा सध्याचा काळ असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना संधी देण्याचे प्रमाण आजही अल्पच आहे. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या १९५१ पासूनच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला असता आजवरच्या १६ निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून केवळ ८ रणरागिणींनी लोकसभेच्या रणात लढत दिली आहे. काँग्रेसने सन २००४ मध्ये उज्ज्वलाताई शिंदे यांना लढण्याची संधी दिली. त्यांनी तीन लाखांवर मते घेतली. तत्पूर्वी १९८० मध्ये बार्शीच्या प्रभाताई झाडबुके यांनी अर्स काँग्रेसकडून दोन हात केले. जिल्ह्यातील या महिला उमेदवारांच्या पदरी मात्र अपयश आले; पण त्या रणांगणात उतरल्या हेच लोकशाहीसाठी पोषक मानले जात आहे.

काँग्रेसचे त्यावेळी दोन गट होते. सोलापूर मतदारसंघात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला मानणाºया काँग्रेसकडून १९८० साली गंगाधरपंत कुचन निवडणूक रिंगणात होते; तर इंदिराबार्इंशी बंड करणाºया नेत्यांच्या काँग्रेसकडून बार्शीच्या प्रभाताई झाडबुके यांनी लढत दिली होती. त्यांच्याच शहरातील ज्येष्ठ समाजवादी नेते साथी पन्नालाल सुराणा हेही जनता पक्षाकडून नशीब आजमावित होते. या निवडणुकीत कुचन विजयी झाले; पण जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी लढणाºया पहिल्या महिला म्हणून प्रभातार्इंनी इतिहासात नाव कोरले. त्यांना ६५ हजार ७७ अर्थात १७.१० टक्के मते मिळाली. १९९१ मध्ये कलावती गायधनकर या महिलेने अपक्ष म्हणून सोलापुरात नशीब आजमाविले होते.

सोलापूरमध्येच १९९८ मध्ये इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्या पत्नी भारती पाटील यांनी जनता दलाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना २६८३८ मतांवर समाधान मानावे लागले. भारती पाटील यांनी प्रभावीपणे प्रचार केला होता. मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत त्या आणि त्यांचे समर्थक पोहोचले होते. निवडणुकीतील त्यांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लक्षात राहणारा ठरला.

सन २००४ च्या निवडणुकीत उज्ज्वलाताई शिंदे या काँग्रेसकडून लढण्यासाठी पुढे आल्या. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा असल्यामुळे उज्ज्वलातार्इंना निवडणुकीत उतरावे लागले. यावेळी त्यांचा थोडक्यात पराभव झाला. नागमणी जक्कन या अपक्ष महिला उमेदवाराने काँग्रेसची मते खेचल्यामुळे उज्ज्वलातार्इंना पराभवास सामोरे जावे लागले, असे त्यावेळी राजकीय निरीक्षकांनी विश्लेषण केले होते. या निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख विजयी झाले; पण उज्ज्वलातार्इंना ३ लाख १० हजार ३९० मते मिळाली. याच निवडणुकीत पंढरपुरात डॉ. श्रध्दा हरिदास सोनवणे या लोकसभेच्या रणांगणात उतरल्या होत्या.

सन २००९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे देशात चर्चेत आलेल्या माढा मतदारसंघात सोलापूरच्या नागमणी जक्कन यांनी उमेदवारी दाखल केली होती; तर सन २०१४ मध्ये माढ्यातून अ‍ॅड. सविता शिंदे यांनी आम आदमी पक्षाकडून नशीब आजमाविले. त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यावेळी परिश्रम घेतले होते.

सोलापूर, (पंढरपूर), माढ्यातील महिला उमेदवार

  • १९८० (सोलापूर)    प्रभावती झाडबुके (अर्स काँग्रेस)    ६५०७७
  • १९९१ (सोलापूर)    कलावती गायधनकर (अपक्ष)    ३८५४
  • १९९८ (सोलापूर)    भारती पाटील (जनता दल)    २६८३८
  • २००४ (सोलापूर)    उज्ज्वलाताई शिंदे (काँग्रेस)    ३१०३९०
  • २००४ (सोलापूर)    नागमणी जक्कन        ८५०३
  • २००४ (पंढरपूर)    डॉ. श्रध्दा सोनवणे        १२८९५
  • २००९ (माढा)    नागमणी जक्कन        २७९९
  • २०१४ (सोलापूर)    छाया केवाळे            १६५४
  • २०१४ (माढा)    अ‍ॅड. सविता शिंदे        ७१६०

लोकसभेच्या रिंगणात महिला उमेदवार नसतात हे खरं तर दुर्देवी आहे. महापौर पदावर काम करताना एक महिला म्हणून त्रास दिला जातो. इतर महिलाही ही गोष्ट पाहत असतील. त्यामुळेच त्या राजकारणात यायला तयार नसतात. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना जास्तीत जास्त आरक्षण असायला हवे. 
- शोभा बनशेट्टी, महापौर, सोलापूर मनपा. 

Web Title: Only eight Ranaragini fighters from the Solapur district contested the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.