मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 07:08 PM2018-06-07T19:08:54+5:302018-06-07T19:08:54+5:30

Ministry will take the city out of the city: Urban Development Minister | मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री

मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने - रणजित पाटील निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल - रणजित पाटील

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ नियोजनबद्ध असे नयना हे नवीन शहर वसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ़ प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर आदी उपस्थित होते. 

डॉ. रणजित पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईतील गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय मुंबई बाहेर न्यावे लागेल. चंदीगड, नवी मुंबई प्रमाणे नयना नावाचे नवीन शहर देखील वसविण्यात येत आहे. त्याचे काम सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. 
पंढरपूरचा विकास करताना स्थानिक नागरिकांचा विचार केला जात नाही. पंढरपूर शहरात सुमारे ८१ कोटी रुपये खर्चून ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. पण ती वापराअभावी धूळखात पडून आहेत. सध्या घाटाचे काम देखील चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. भाविकांच्या सामान ठेवण्याची सोय व्हावी, यासाठी बांधण्यात आलेल्या लॉकर रुमही अयोग्य ठिकाणी बांधल्यामुळे त्याचा वापर होत नाही. विकासकामे होत असताना योग्य नियोजन नसल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे, असे अनेक प्रश्न पत्रकारांनी डॉ. पाटील त्यांना विचारले असता त्यांनी शांतपणे ऐकून घेऊन म्हणाले, पंढरपूरच्या इतिहासात कधी नव्हे इतका निधी या चार वर्षांच्या काळात शासनाने पंढरपूरसाठी खास बाब म्हणून दिलेला आहे. पूर्वी केवळ घोषणा होत होत्या; मात्र आता प्रत्यक्ष कामे होत आहेत. ही सर्व कामे होत असताना काही त्रुटी असतील तर त्याची दखल घेऊन निश्चित सुधारणा केल्या जातील. निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नगरविकास राज्यमंत्री अनभिज्ञ 
कॅनडा सरकारकडून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी कमी व्याजदराने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात गेल्या आषाढी यात्रेच्या वेळी सुतोवाच केले होते. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. दरम्यान, कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज यांनी देखील यासंदर्भात पंढरपूरचा दौरा केला़ पण पुढे काहीच झालेले नाही, याविषयी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर डॉ. पाटील यांनी यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगून अनभिज्ञता व्यक्त केली. 

Web Title: Ministry will take the city out of the city: Urban Development Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.