लोकमत इनिशिएटिव्ह; कचरा टाकणाºयांना जाग यावी यासाठी नगरसेविका काढणार जनजागृती रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:31 PM2018-12-24T12:31:26+5:302018-12-24T12:33:18+5:30

जुळे सोलापूर : कचराफेकूंवर अधिकाधिक दंडात्मक कारवाईचा इशारा

Lokmat Initiative; A public awareness rally to remove the garbage dump! | लोकमत इनिशिएटिव्ह; कचरा टाकणाºयांना जाग यावी यासाठी नगरसेविका काढणार जनजागृती रॅली !

लोकमत इनिशिएटिव्ह; कचरा टाकणाºयांना जाग यावी यासाठी नगरसेविका काढणार जनजागृती रॅली !

Next
ठळक मुद्देसोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ‘लोकमत’ शहरात रस्त्यावर कचरा टाकणाºया लोकांची पोलखोल स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेला गतीया मोहिमेत शहराच्या विविध भागातील महिला सहभागी होत आहेत.

सोलापूर : कचरा संकलित करण्यासाठी नियमित घंटागाडी येऊनही रस्त्यावर टाकणाºया कचराफेकंूना जाग यावी यासाठी जुळे सोलापूर भागातील नगरसेविका  लवकरच जनजागृती रॅली काढणार आहेत. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने या आठवड्यात कचराफेकूंच्या बंदोबस्तासाठी जास्तीत जास्त  दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

रस्त्यावर कचरा टाकणाºया लोकांना अटकाव घालण्यासाठी शहरातील स्मार्ट महिलांनी लोकमतच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. शहरातील अनेक भागातील महिला बेशिस्त लोकांना रस्त्यावर कचरा टाकण्यापासून रोखत आहेत. 

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाईचा धडका  लावला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी अनेक लोकांवर दंडात्मक कारवाई झाली.  यादरम्यान भाजपच्या नगरसेवकांनी  लोकमतच्या अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आपल्या प्रभागात जनजागृती रॅली काढणार आहेत.

‘प्रारंभ’ने प्रारंभही केला- संगीता जाधव
- आमचा प्रारंभ प्रतिष्ठानच्या वतीने जुळे सोलापुरातील काही भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी फलक लावले आहेत. आता पुन्हा नव्याने आम्ही मोहीम हाती घेत आहोत. प्रभागात एक रॅली काढून रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करु. सोलापूर शहर स्मार्ट होतंय, त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. रस्त्यावर कचरा टाकण्याविरोधात  छेडण्यात येणाºया मोहिमेत विद्यार्थी सहभागी होतील. विद्यार्थी ही पुढची पिढी आहे. त्यांना एकदा चांगली गोष्ट समजली की ते आपल्या पालकांना स्वच्छतेबाबत जागरुक राहायला सांगतील. जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करायला सांगणार आहोत, असे नगरसेविका संगीता जाधव यांनी सांगितले.

आम्ही यापूर्वी आमच्या प्रभागात जनजागृती स्वच्छता रॅली काढली होती. नियमित घंटागाड्या येत असताना लोक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. ही सवय बदलायला वेळ लागेल. आपलं शहर स्मार्ट होतंय, मग आपण या सवयी बदलायला हव्यात, असे लोकांना वाटले पाहिजे. आमच्या शाळेतील मुलांसमवेत आम्ही या आठवड्यात जनजागृती रॅली काढणार आहोत. आमच्या प्रभागातील ज्या रस्त्यावर आजही कचरा दिसतोय. त्या भागातील लोकांना समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करु. लोकांमध्ये बदल होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
-अश्विनी चव्हाण
नगरसेविका प्रभाग क्र.२४

स्मार्ट महिलांनी हातात खराटा घेऊन केली सफाई

  • - सोलापूर : महापालिकेची घंटागाडी नियमित येत नसल्याने कांचनगंगा नगरातील महिलांनी आज रस्त्यावरील कचरा साफ केला. यापुढे कोणीही रस्त्यावर कचरा टाकणार नाही, जी महिला अथवा पुरुष रस्त्यावर कचरा टाकेल त्यांची नावे महानगरपालिकेला कळविण्यात येणार असल्याचा एल्गार येथील भगिनींनी रविवारी दुपारी घेतला.
  • - सोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ‘लोकमत’ शहरात रस्त्यावर कचरा टाकणाºया लोकांची पोलखोल करीत आहे. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेला गती देण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेत शहराच्या विविध भागातील महिला सहभागी होत आहेत.
  • - काचनगंगा नगरात घंटागाडी नियमित येत नसल्याने काही महिला रस्त्यावर कचरा टाकतात, त्याचा त्रास सगळ्यांना सोसावा लागत आहे. परिसरातील घाणीमुळे एका महिन्यात आठ वर्षांच्या मुलाला दोनदा डेंग्यूचा आजार झाला असे एका भगिनीने सांगितले. तेथील दीप्ती कुलकर्णी, सुनीता बायस, अश्विनी नरोटे, वर्षा पुजारी, मंगल यवतकर, गीता वाघमोडे, अंबिका चडचणे, रसिया फजल खान, महानंदा हलवळे, श्वेता राजमाने, कस्तुरबाई हालोळे, लक्ष्मीबाई सोनकट्टे यांनी दुपारी हातात खराटा घेऊन परिसर साफ केला. यापुढे रस्त्यावर कचरा टाकणार नाही, जो कोणी कचरा टाकेल त्याची नावे मनपा प्रशासनाला कळविण्यात येणार आहेत.

Web Title: Lokmat Initiative; A public awareness rally to remove the garbage dump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.