Lok Sabha Election 2019: माढा मतदारसंघात १८ लाख ८६ हजार ३१३ मतदार देणार कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:05 PM2019-03-11T12:05:11+5:302019-03-11T12:05:56+5:30

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील आणि ...

Lok Sabha Election 2019: There will be 18 lakh 86 thousand 313 voters in Madha constituency | Lok Sabha Election 2019: माढा मतदारसंघात १८ लाख ८६ हजार ३१३ मतदार देणार कौल

Lok Sabha Election 2019: माढा मतदारसंघात १८ लाख ८६ हजार ३१३ मतदार देणार कौल

Next

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात लढत झाली होती. मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटील २५ हजार ३४४ मतांनी विजयी झाले.  यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा या मतदारसंघातून लढणार असल्याने संपूर्ण देशाचे  लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे. या मतदारसंघात १८,८६,३१३ मतदार कौल देणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस आणि सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण या विधानसभा मतदासंघाचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्याचा पश्चिम भाग आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाचाही या मतदारसंघात समावेश आहे. यातील  तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. एक शेतकरी कामगार पक्ष, एक शिवसेना आणि एक काँग्रेसच्या ताब्यात आहे. 

माढा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला, पंढरपूर, माळशिरस हे मतदारसंघ पूर्वीच्या पंढरपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होते. या पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संदीपान थोरात सलग सातवेळा निवडून आले होते. 

२००९ च्या दरम्यान झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत सांगली जिल्ह्यातील तालुके वगळून माढा लोकसभा मतदारसंघाची रचना करण्यात आली.

२००९ साली या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपाचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्यात मुख्य लढत झाली होती. या लढतीने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. शरद पवार हे मताधिक्याने विजयी झाले होते. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांच्यात कांटे की टक्कर झाली. या लढतीत मोहिते-पाटील निवडून आले. 

पुन्हा शरद पवार विरुद्ध सुभाष देशमुख सामना

  • - माढा मतदारसंघात आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात सहकारमंत्री सुभाष देशमुख लढणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. देशमुखांनी गावभेटी सुरू केल्या आहेत.
  • - वंचित बहुजन आघाडीने अ‍ॅड. विजयराव मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मोरे यांचेही गावभेट दौरे सुरू आहेत. 

आमदार किती, कुणाचे ?
माढा, माळशिरस, फलटण     :     राष्ट्रवादी 

  • सांगोला              :     शेकाप
  • करमाळा             :     शिवसेना
  • माण/खटाव                          :     काँग्रेस

माढा लोकसभा  (पूर्वीच्या पंढरपूर)  मतदारसंघातील आतापर्यंतचे खासदार

  • १९५२        बापूसाहेब राजभोज     (शेकाप)
  • १९५७        तायप्पा सोनवणे     (काँग्रेस)
  • १९६२        तायप्पा सोनवणे     (काँग्रेस)    
  • १९७१        एन.एस. कांबळे     (काँग्रेस रिपाइं युती)
  • १९७७        संदिपान थोरात     (काँग्रेस)
  • १९८०        संदिपान थोरात     (काँग्रेस)
  • १९८४        संदिपान थोरात     (काँग्रेस)
  • १९८९        संदिपान थोरात     (काँग्रेस)
  • १९९१        संदिपान थोरात     (काँग्रेस)
  • १९९६        संदिपान थोरात     (काँग्रेस)
  • १९९८        संदिपान थोरात     (काँग्रेस)
  • १९९९        रामदास आठवले     (अपक्ष व रिपाइं)
  • २००४        रामदास आठवले    (अपक्ष व रिपाइं)
  • २००९        शरद पवार        (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • एकूण मतदान - १८,८६,३१३, स्त्री मतदार - ८,९५,९९७, पुरुष मतदार - ९,९०,३०४

Web Title: Lok Sabha Election 2019: There will be 18 lakh 86 thousand 313 voters in Madha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.