Lok Sabha Election 2019; २३१९ शस्त्रे जमा करा; सोलापूर शहर पोलिसांनी धाडल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:17 PM2019-03-14T13:17:19+5:302019-03-14T13:21:45+5:30

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात येत्या १८ आणि २३ तारखेला सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ...

Lok Sabha Election 2019; 231 9 Collect weapons; Solapur city police notices issued | Lok Sabha Election 2019; २३१९ शस्त्रे जमा करा; सोलापूर शहर पोलिसांनी धाडल्या नोटिसा

Lok Sabha Election 2019; २३१९ शस्त्रे जमा करा; सोलापूर शहर पोलिसांनी धाडल्या नोटिसा

Next
ठळक मुद्देशहरात ५१२ पैकी ४४२ जणांना निर्देश, १०० शस्त्रे जमाविजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक परवानाधारक

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात येत्या १८ आणि २३ तारखेला सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत आपली शस्त्रे जमा करावीत, अशा नोटिसा पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाने संबंधितांना बजावल्या आहेत. शहरात ५१२ आणि जिल्ह्यात ३ हजार ९३९ असे एकूण ४५५१ परवानाधारक आहेत. यात जिल्ह्यातून १८७७ आणि शहरातून ५४२ जणांना शस्त्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यात उद्योजक, व्यावसायिक, विविध कंपन्या, बँकांमध्ये काम करणारे सुरक्षारक्षक अशा विविध घटकांमधील नागरिकांनी सबळ कारणे स्पष्ट करून सुरक्षेच्या दृष्टीने रितसर शस्त्र बाळगण्याचे परवाने घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या कार्यवाहीतून बँका, कंपन्यांमध्ये सुरक्षेची कामे करणाºया ७० जणांना यातून वगळण्यात आले आहे. यामुळे शहरातल्या ४४२ जणांना शस्त्रे पोलीस आयुक्तालयामध्ये जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित परवानाधारकांना ११ मार्च रोजी नोटिसीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. १८ मार्चपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. या सूचनेनुसार परवानाधारकांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. 

विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक परवानाधारक
च्सोलापूर शहरात सात पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत ५७२ शस्त्र परवानाधारकांपैकी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३१ म्हणजे सर्वाधिक परवानेधारक आहेत. त्या खालोखाल फौजदार चावडी हद्दीमध्ये ११९, सदर बझार- ९३, जोडभावी- ५४, जेलरोड- ३१, सलगर वस्ती- ३० आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० जणांचा समावेश आहे. 

असे आहेत शस्त्राचे प्रकार 

  • - १२ बोअर, रिव्हॉल्व्हर आणि पिस्टल अशा तीन प्रकारच्या शस्त्रांना सुरक्षेच्या कारणावरून पोलीस आयुक्तालयाकडून परवाने देण्यात आले आहेत. स्वत:ची अथवा आपल्या फर्मच्या सुरक्षेसाठी असे परवाने देण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडली जावी, यासाठी परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करण्याचे काम सुरू आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पार पडेपर्यंत ही शस्त्रे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असतील. हा दैनंदिन कामाचा एक भाग आहे. निवडणूक काळात शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज आहे. जनतेनेही यामध्ये सक्रिय योगदान द्यावे.
- महादेव तांबडे, पोलीस आयुक्त

अन्यथा कारवाई- पोलीस आयुक्त

  • - शस्त्रे जमा करण्याच्या सूचना देऊनही ती जमा केली नाहीत तर संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. परवानाधारकांनी दिलेल्या मुदतीत ती जमा करावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी स्पष्टोक्ती पोलीस आयुक्त तांबडे यांनी दिली. 

Web Title: Lok Sabha Election 2019; 231 9 Collect weapons; Solapur city police notices issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.