१० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:48 PM2018-01-08T12:48:33+5:302018-01-08T12:50:33+5:30

संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

Knowledge of Guardian Minister Vijaykumar Deshmukh, two years' planning of Ujani water after release of water from Ujani on January 10 | १० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन

१० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन

googlenewsNext
ठळक मुद्देऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही.सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : उजनीतील पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन केले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयातील पाणी जरी संपले असले तरी चिंचपूर बंधाºयात सोलापूर शहराला २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक असल्याचा अहवाल पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही. सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. 
संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. उजनी धरणात सध्या १०४ टक्के पाणीसाठा आहे. उजनीतील  उपलब्ध पाण्याचे पुढील दोन वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील वर्षी जरी पाऊस झाला नाही तरी शेतीला आणि पिण्याला पाणी कमी पडू नये असे नियोजन करण्यात आलेले आहे. उजनी भरलेले आहे म्हणून पाणी सोडा असे नसते.  आत्ता असलेल्या पाण्याचे जर नियोजन करून वापर केला तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करत शहराच्या पाणीपुरवठ्याबरोबरच शेतीच्या पाण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले हे सतत संपर्कात आहेत.  मीही रोजच्या रोज पाणीपुरवठ्याची माहिती घेत आहे. त्यामुळे सोलापूर शहराला एक थेंबही पाणी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
औज बंधाºयातील पाणी पातळी जरी शून्यावर गेली असली तरी चिंचपूर बंधाºयात २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक आहे. पालिकेचे अधिकारीही पाण्याचा अपव्यय टाळत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी झटत आहेत. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकळी इंटेकवेल इथे पाच फूट पाणी आहे,तर चिंचपूर बंधाºयाची पातळी  एक मीटर असल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. 
-----------------------
उजनी धरणात १०४ टक्के पाणी असले तरी त्याची उधळपट्टी करणार नाही. किंवा पाण्यासाठी जिल्हा तडफडू देणार नाही. पुढील वर्षी पाऊस झाला नाही तरी पाणी कमी पडणार नाही या पध्दतीने  उजनीतील पाण्याचे नियोजन केले  असून जनतेने विनाकारण पाण्याची उधळपट्टी करु नये. पाणी काटकसरीनेच वापरावे.
 -विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

Web Title: Knowledge of Guardian Minister Vijaykumar Deshmukh, two years' planning of Ujani water after release of water from Ujani on January 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.