कुंभारीत जुगार अड्ड्यावर धाड; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:19 PM2018-12-22T12:19:26+5:302018-12-22T12:20:27+5:30

सोलापूर : पोलिसांना खबर लागू नये म्हणून दूर शेतात चालवल्या जाणाºया जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून १२ जणांना ...

Horses on a hawk; Twenty-two lakh worth of money seized, 12 arrested | कुंभारीत जुगार अड्ड्यावर धाड; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांना अटक

कुंभारीत जुगार अड्ड्यावर धाड; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जणांना अटक

Next
ठळक मुद्देकारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या १२ जणांना वळसंग पोलीस ठाण्याच्या स्वाधीनही कारवाई विशेष पथकातील फौजदार ए. एस. तांबे, डी.एस. दळवी यांच्यासह सहकाºयांनी केलीकुंभारी गावाच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला

सोलापूर: पोलिसांना खबर लागू नये म्हणून दूर शेतात चालवल्या जाणाºया जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कुंभारी गावाच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. सर्व आरोपींवर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. 

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास कुंभारी येथे बेकायदेशीर जुगार चालत असल्याची खबर मिळाली. यानुसार या पथकाने गुरुवारी सायंकाळी कुंभारी गाव गाठले. आळे यांच्या शेतात हा अड्डा सुरू असल्याचे समजताच पथकाने धाड टाकली. यात जुगाराचे साहित्य, वाहने असा २ लाख २१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जुगार खेळताना १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये  शाहरुख रमजान नदाफ (रा.नवीन घरकूल  ता.द. सोलापूर), अंबादास नारायण श्रवण (रा. नवीन घरकृल, ता.द. सोलापूर), अरबाज सैफन शेख  (रा.नवीन घरकूल, ता.द. सोलापूर), सिराज वजीरसाब पटेल (रा. नवीन घरकूल, ता.द. सोलापूर), नागेश बाळकृष्ण पुल्ले  (रा. नवीन घरकूल, ता. द. सोलापूर), आरिफ खाजोमौद्दिन शेख (रा.नवीन घरकूल, ता. द. सोलापूर), दत्ता हिरालाल शिंगे (दक्षिण सोलापूर), दत्तू शंकर            वीटकर (रा. देसाई नगर, सोलापूर) श्रीनिवास बुचय्या कोटा (रा. नवीन घरकूल ता.द. सोलापूर), तौफिक नैताब शेख (रा. नई जिंदगी, सोलापूर), वसीम रफिक मुंडेवाडी (रा.शास्त्रीनगर, ता. द. सोलापूर), शरणप्पा साईदप्पा कोळी (रा. मल्लिकार्जुन नगर, सोलापूर) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पथकाने कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या १२ जणांना वळसंग पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  ही कारवाई विशेष पथकातील फौजदार ए. एस. तांबे, डी.एस. दळवी यांच्यासह सहकाºयांनी केली. 

Web Title: Horses on a hawk; Twenty-two lakh worth of money seized, 12 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.