भक्ताच्या भेटीला देव

By admin | Published: July 24, 2014 01:15 AM2014-07-24T01:15:41+5:302014-07-24T01:15:41+5:30

पांडुरंगाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान

God of devotees meeting | भक्ताच्या भेटीला देव

भक्ताच्या भेटीला देव

Next


पंढरपूर : महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असल्यातरी पांडुरंगाची पालखी मात्र संत सावता माळी यांना भेटण्यासाठी अरणला जाण्याची परंपरा आहे. बुधवारी सकाळी पांडुरंग भक्ताच्या भेटीला पंढरीच्या काशीकापडी मठातून अरणकडे मार्गस्थ झाला. आज रोपळे येथील मुक्काम आटोपून पुढील प्रवासाला ही पालखी मार्गस्थ होणार आहे.
पांडुरंगाच्या पालखीची महापूजा नागेश गंगेकर यांनी केली. काशीकापडी मठातून पालखी सकाळी दहाच्या सुमारास निघाली.
यावेळी आबासाहेब कापसे, विजय टमटमकर, मधुकर इंदापूरकर, दत्तात्रय पिंगळे, राजू पिंगळे, श्याम गंगेकर, बाबू गंगेकर, दीपक इंदापूरकर, गणेश भिंगारे, अजय गंगेकर, सूरज गंगेकर, नितीन पानकर हे उपस्थित होते.
प्रथम पालखी नवीपेठेतील व्यापारी कमिटीशेजारील मारुती मंदिरासमोर अभंग म्हणून पुढे ज्ञानेश्वर महाराजांच्या मठासमोर अभंग म्हणून अरणकडे प्रस्थान झाली. २६ रोजी ४ वाजता अरणमध्ये देहूकर माऊली यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर श्रीफळ हंडीचा कार्यक्रम होणार आहे. २७ रोजी नगरप्रदक्षिणा व महाद्वार काला, भारुड कार्यक्रम होणार आहे. २८ रोजी सकाळी १० वाजता पांडुरंगाच्या पालखीचे पुन्हा पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
-----------------------------
ुउद्या पुण्यतिथी सोहळा
पांडुरंगाचा पालखी सोहळा रोपळे, आष्टी या ठिकाणी मुक्काम करुन शुक्रवारी (२५ जुलै) सायंकाळी अरण येथे पोहोचणार आहे. या दिवशी संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा होणार आहे.

Web Title: God of devotees meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.