डिसले गुरुजींनी परस्पर आयडी-पासवर्ड वापरून काढले वेतन; चौकशी अहवालात ठपका 

By शीतलकुमार कांबळे | Published: July 15, 2022 05:08 PM2022-07-15T17:08:25+5:302022-07-15T17:40:34+5:30

Ranjitsinh Disale : डिसले गुरुजी यांच्यावर असलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

global award winner teacher ranjitsinh disale withdraws salary using mutual id-password; Blame in inquiry report | डिसले गुरुजींनी परस्पर आयडी-पासवर्ड वापरून काढले वेतन; चौकशी अहवालात ठपका 

डिसले गुरुजींनी परस्पर आयडी-पासवर्ड वापरून काढले वेतन; चौकशी अहवालात ठपका 

googlenewsNext

- शितलकुमार कांबळे

सोलापूर : परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी डिसले गुरुजी यांचे प्रतिनियुक्ती कालावधीत डायट येथील उपस्थिती अहवाल न घेता वेतन काढले. या दरम्यान डिसले गुरुजी कुठे होते, याचे उपस्थिती प्रमाणपत्र शाळेत सादर केले नाही. मुख्याध्यापकांना विचारले असता शालार्थ प्रणालीच्या आयडी व पासवर्डचा वापर करुन रणजितसिंह डिसले यांनीच परस्पर वेतन काढल्याचे सांगितले, असे चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डिसले गुरुजी यांच्यावर असलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या चौकशी समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, शिक्षण विस्तार अधिकारी हरिश राऊत, गोदावरी राठोड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तजमुल्ल मुतवल्ली यांचा या समितीत समावेश आहे.

चौकशी समितीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांच्याकडे विचारणा केली. 5 फेब्रुवारी रोजी 2018 रोजी कार्यालयाकडे हजर घेणेबाबतचा रुजू रिपोर्ट सादर केला, पण हजेरी पत्रकात सही न करता ते निघून गेले. ते एकदाही कार्यालयाकडे फिरकले नाहीत. 1 नोव्हेंबर 2018 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान प्रतिनियुक्तीला मुदतवाढ दिल्यानंतरही ते उपस्थित राहिले नाहीत.

डिसले गुरुजींनी याबाबत खुलासा केला असून यामध्ये नोव्हेंबर 2017 ते जून 2018 दरम्यान सोलापूर विज्ञान केंद्र येथे काम केल्याचे नमूद केले आहे. मात्र याबाबत एकही लेखी पत्र त्यांनी सादर केले नाही. 6 जून 2018 ते मार्च 2020 दरम्यान डिसले गुरुजी यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट येथे काम केल्याचे नमूद केले आहे. त्यांनी यासमर्थनार्थ कागदपत्र सादर केले नाही. सिंहगडने देखील डिसले गुरुजी हे एकदी दिवस उपस्थित नसल्याचे कळविल्याचे अहवालात नमूद केले आहे.
 

Web Title: global award winner teacher ranjitsinh disale withdraws salary using mutual id-password; Blame in inquiry report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.