सोलापुरातील नरेंद्र मोदींच्या सभेसाठी चार मैदानांची पाहणी; मात्र निर्णय घेणार दिल्लीची सुरक्षा यंत्रणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 03:12 PM2019-01-03T15:12:47+5:302019-01-03T15:15:49+5:30

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी सोलापुरात विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी येत आहेत. यावेळी मोदी यांच्या  सभेसाठी आवश्यक ...

Four mines survey for Narendra Modi's meeting in Solapur; But Delhi's security system will decide | सोलापुरातील नरेंद्र मोदींच्या सभेसाठी चार मैदानांची पाहणी; मात्र निर्णय घेणार दिल्लीची सुरक्षा यंत्रणा 

सोलापुरातील नरेंद्र मोदींच्या सभेसाठी चार मैदानांची पाहणी; मात्र निर्णय घेणार दिल्लीची सुरक्षा यंत्रणा 

Next
ठळक मुद्देसोलापुरातील चार मैदानांची पाहणी करून सहकारमंत्री व पालकमंत्री यांनी चाचपणीदिल्लीहून पंतप्रधान कार्यालय सुरक्षा समितीचे वरिष्ठ अधिकारी सोलापुरातपंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी सोलापुरात विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी येत आहेत

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारी रोजी सोलापुरात विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी येत आहेत. यावेळी मोदी यांच्या  सभेसाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करण्यासाठी सहकारमंत्री देशमुख, पालकमंत्री देशमुख यांनी अधिकाºयांसमवेत शहरातील चार मैदानांची पाहणी केली. मात्र गुरुवारी दिल्लीहून पंतप्रधान कार्यालय सुरक्षा समितीचे वरिष्ठ अधिकारी सोलापुरात आल्यानंतरच जागा निश्चित होणार आहे.

दुपारी सहकारमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदीसह अन्य नियोजन विषयातील अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या दौºयात अपेक्षित असणाºया कार्यक्रमाची माहिती व त्यासाठी आवश्यक असणारे नियोजन याबाबत सहकारमंत्र्यांनी यावेळी अधिकाºयांना सूचना दिल्या. 

पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम शहरातील एकाच ठिकाणी घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी सोलापूर-येडशी या महामार्गाचे लोकार्पण, सोलापूर महापालिका क्षेत्रातील स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचा शुभारंभ अमृतसर योजनेतील कामे, रे नगर येथील ३0 हजार घरकुलांची पायाभरणी आदी विकासकामांचा शुभारंभ एकाच व्यासपीठावर ई प्रणालीने कळ दाबून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पंतप्रधान यांच्या दौºयाची तयारी सुरू करण्यात आली असली तरी कार्यक्रम व जागा अजून निश्चित करण्यात आली नाही अशी माहिती बैठकीनंतर महसूल उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकारांना दिली. 

मैदानावर एकत्र आले दोन्ही देशमुख
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयाची तयारी करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी प्राधान्याने पुढाकार घेतला आहे. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व विभागांच्या अधिकाºयांसमवेत आढावा घेत सूचना दिल्या. या बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची मात्र गैरहजेरी होती. सायंकाळी चारच्या सुमारास सहकारमंत्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकाºयांना समवेत घेऊन सभेसाठी अपेक्षित असणाºया जागेसाठी चार मैदानांची पाहणी केली. यावेळी पाहणी करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे दोन्ही देशमुख मैदानावर एकत्र आल्याचे दिसले. 

दोन्ही देशमुखांमुळे राजशिष्टाचार विभागासमोर पेच वाढला...
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करणाºया व्यक्तींची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील राजशिष्टाचार विभागाकडून करण्यात येत आहे. पालकमंत्री म्हणून विजय देशमुख यांना या कार्यक्रमात सुरुवातीला स्वागतपर प्रास्ताविक करण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न नियमाने होत आहे; मात्र सहकारमंत्री देशमुख यांचेही यावेळी भाषण ठेवण्याचा आग्रह होत असल्याने राजशिष्टाचार विभाग विचार करीत आहेत.

या मैदानांचा झाला विचार
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया सभेसाठी सोलापुरातील चार मैदानांची पाहणी करून सहकारमंत्री व पालकमंत्री यांनी चाचपणी केली. जुनी मिल येथील मैदान, जुळे सोलापुरातील म्हाडा समोरील मैदान, सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोरील मैदान व विजापूर रोडवरील डीएड कॉलेजजजवळील सैनिकी शाळेच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या जागेची यावेळी अधिकाºयांसमवेत पाहणी करण्यात आली. जुळे सोलापुरातील म्हाडा समोरील मैदानात एकाच ठिकाणी सर्व कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Four mines survey for Narendra Modi's meeting in Solapur; But Delhi's security system will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.