बायकोशी भांडण...! नवऱ्यानं प्राशन केलं पोलीस ठाण्यासमोर कीटकनाशक

By रवींद्र देशमुख | Published: April 25, 2024 07:22 PM2024-04-25T19:22:58+5:302024-04-25T19:23:14+5:30

नवरा -बायकोची राहत्या घरी कुरबूर होऊन भांडण झालं.

Fight with wife husband asked for insecticide in front of the police station in solapur | बायकोशी भांडण...! नवऱ्यानं प्राशन केलं पोलीस ठाण्यासमोर कीटकनाशक

बायकोशी भांडण...! नवऱ्यानं प्राशन केलं पोलीस ठाण्यासमोर कीटकनाशक

सोलापूर : नवरा -बायकोची राहत्या घरी कुरबूर होऊन भांडण झालं. रागाच्या भरामध्ये नवऱ्यानं मोहोळ पोलीस ठाण्याच्या समोर कीटक नाशक प्राशन करण्याचा धक्कादायक प्रकार दुपारी समोर आला. आकाश बाळू काळे (वय- २१, रा. चौधरी मसले, ता. मोहोळ) असे या तरुणाचे नाव आहे. यातील कीटकनाशक प्राशन केलेला आकाश हा कुटुंबासमवेत मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे राहतो. 

दुपारी त्याची बायकोशी कुरबूर झाली. यातून झालेल्या शाब्दिक चकमकीतून रागाच्या भरामध्ये त्याने मोहोळच्या पोलीस स्टेशनसमोर पिकावर फवारण्याचं कीटकनाशक प्राशन केले. थोड्याच वेळात त्याला उलट्या होऊ लागल्या. तातडीने त्याची आई रु्क्मिणी याने मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात नेलं. येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याला तेथून येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात आले.

Web Title: Fight with wife husband asked for insecticide in front of the police station in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.