निवडणुक तयारी; सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करी, जुगार, अवैध दारू विकणारे ७२५८ आरोपींवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 03:00 PM2019-03-05T15:00:53+5:302019-03-05T15:02:04+5:30

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुंड, अवैध वाळू तस्करी, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आदींसह एकूण ...

Election preparations; Prevention of preventive measures against 7,258 accused of sand smuggling, gambling and illegal liquor sale in Solapur district | निवडणुक तयारी; सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करी, जुगार, अवैध दारू विकणारे ७२५८ आरोपींवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई

निवडणुक तयारी; सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करी, जुगार, अवैध दारू विकणारे ७२५८ आरोपींवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईआगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी म्हणून गुन्हेगारांची यादी तयार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुंड, अवैध वाळू तस्करी, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आदींसह एकूण ७ हजार २५८ आरोपी निष्पन्न झाले आहेत. आगामी लोकसभाविधानसभा निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी म्हणून गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्ह्यात शरीरविषयक २ हजार २७९, मालविषयक ६७0, अवैध वाळूविषयी ३६१, जुगार व मटक्याविषयी १ हजार ६४ व अवैध दारूविषयक २ हजार ८८४ अशा गुन्ह्यांतील एकूण ७ हजार २५८ आरोपी आहेत. ज्या गुन्हेगारांवर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांना बोलावून त्यांचे मेळावे घेण्यात आले आहेत. आरोपींना यापुढे गुन्हा केल्यास त्यांच्यावर होणाºया प्रतिबंधात्मक कारवाईबाबत समज देण्यात आली आहे.

२७ नोव्हेंबर २0१८ रोजी नाशिक येथील सेशन कोर्ट सरकारी अभियोक्ता संजय पाटील यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. ११ जानेवारी २०१९ रोजी निवृत्त पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी व कर्मचारी यांना एमपीडीए तडीपार या विषयावर सखोल माहिती दिली आहे. १ नोव्हेंबर २0१८ पासून आजतागायत एकूण ८0 आरोपी टु प्लस यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींविरुद्ध सध्या प्रथमवर्ग न्यायालयात १३ व सत्र न्यायालयात ६ अशा एकूण १९ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. 

२0११ पासून दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाºया आरोपींवर सीआरपीसी कलम ११0 प्रमाणे १ हजार २११ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. कलम ५५ प्रमाणे ४८ टोळ्या निष्पन्न असून, ३0 टोळ्यांवर कारवाई सुरू आहे. ४ टोळ्या तडीपार केल्या आहेत. कलम ५६ नुसार १२५ आरोपी निष्पन्न असून, ७८ आरोपींवर तडीपारची कारवाई सुरू आहे. कलम ९३ नुसार १0६0 आरोपींवर कारवाई पूर्ण झाली आहे. मोक्का अंतर्गत जानेवारी २0१९ पासून २ टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शरीराविषयी गुन्हे करणाºया ८00 आरोपींची नावे गुंडा रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ४0 आरोपींविरुद्ध कलम ३0७ सारखे गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुंडगिरी व दादागिरी करणाºया ७५ आरोपींच्या टोळ्या निष्पन्न झाल्या आहेत. अवैध वाळू व्यावसायिकांवर कलम ५५ प्रमाणे ५0 आरोपींविरुद्ध हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. 

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे...
- महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपार केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : मल्लिनाथ नागनाथ सुतार, चिदानंद नागनाथ बिराजदार, गेनसिद्ध पंडित माळी (सर्व रा. कुंभारी), अमित उर्फ सोन्या दशरथ माने, नीलेश राजेंद्र परचंडे, लाहुल उर्फ भारत धनंजय परचंडे, सोमनाथ दिगंबर खंकाळ (सर्व रा. पंढरपूर), कृष्णा उर्फ किसन जयराम रजपूत, अभिजित बाळासाहेब कारंडे, सूरज उर्फ सुरेश तुकाराम गायकवाड, हर्षद उर्फ हर्षल रमाकांत होनराव (सर्व रा. बार्शी), .

कलम ५६ प्रमाणे हद्दपार केलेले आरोपी : महेश तानाजी शिंदे (पंढरपूर), बाळू भगवान जाधव (मळोली, ता. माळशिरस), सूरज उर्फ लालया बाबू गंगेकर, ऋषीकेश नवनाथ मेटकरी, विवेक नागेश गंगेकर, विकी मधुकर मेटकरी (सर्व रा. पंढरपूर), उत्तम ज्ञानू लुबाळ (रा. महुद, ता. सांगोला) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

Web Title: Election preparations; Prevention of preventive measures against 7,258 accused of sand smuggling, gambling and illegal liquor sale in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.