सोलापूरातील ‘मेगा पॉवरलूम क्लस्टर’ साठी तीन जागांचा पर्याय, होटगी तलाव, कुंभारी, कुमठे येथील जागांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:44 AM2017-11-28T11:44:01+5:302017-11-28T11:48:23+5:30

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने सोलापुरात उभारण्यात येणाºया मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी जिल्हा प्रशासनाने वस्त्रोद्योग विभागासमोर होटगी, कुंभारी, कुमठे येथील जागांचे पर्याय ठेवले आहेत. येथील जमिनींची पाहणी करून प्रशासनाला कळविण्याची सूचना करण्यात आली आहे. 

Discussion of three seats for 'Mega powerloom cluster' in Solapur, Hotgi lake, Kumbhari, Kumbh | सोलापूरातील ‘मेगा पॉवरलूम क्लस्टर’ साठी तीन जागांचा पर्याय, होटगी तलाव, कुंभारी, कुमठे येथील जागांची चर्चा

सोलापूरातील ‘मेगा पॉवरलूम क्लस्टर’ साठी तीन जागांचा पर्याय, होटगी तलाव, कुंभारी, कुमठे येथील जागांची चर्चा

Next
ठळक मुद्देयंत्रमागधारक कुंभारी येथील जागेसाठी आग्रही ‘अटल सोलर’साठी हवेत आणखी प्रस्तावशेतकºयांना तीन लाख रुपयांचा सोलर कृषीपंप देण्यात येणारजिल्ह्यासाठी २१० सोलर कृषीपंप मिळणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने सोलापुरात उभारण्यात येणाºया मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी जिल्हा प्रशासनाने वस्त्रोद्योग विभागासमोर होटगी, कुंभारी, कुमठे येथील जागांचे पर्याय ठेवले आहेत. येथील जमिनींची पाहणी करून प्रशासनाला कळविण्याची सूचना करण्यात आली आहे. 
सहकारमंत्री सुभाष देशमुख, केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाचे सचिव, महसूल विभागाच्या प्रधान सचिवांची नुकतीच मंत्रालयात बैठक झाली होती. तीत सोलापूर जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. वस्त्रोद्योग विभागाचे सहायक संचालक किसन पवार, प्रादेशिक उपसंचालक राजेंद्र ढंगे, यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, राजू राठी, श्रीनिवास बुरा, राजेश गोस्की आदी उपस्थित होते. या बैठकीत होटगी तलावाजवळ असलेली जलसंपदा विभागाची जमीन, कुमठे येथील गायरान जमिनीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले. कुंभारी येथे २५० एकर जागेवर एमआयडीसी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील जागेचा विचार करून अहवाल सादर करण्याचे ठरले. तीनपैकी एक जागा मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी मिळणार आहे. यंत्रमागधारक कुंभारी येथील जागेसाठी आग्रही आहेत. 
------------------
‘अटल सोलर’साठी हवेत आणखी प्रस्ताव
- अटल सोलर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून ५ एकरांच्या आत जमीन असलेल्या शेतकºयांना तीन लाख रुपयांचा सोलर कृषीपंप देण्यात येणार आहे. महावितरणच्या अधिकाºयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्ह्यासाठी २१० सोलर कृषीपंप मिळणार आहेत. आजवर ५० प्रस्ताव आले आहेत. आणखी प्रस्ताव दाखल व्हावेत यासाठी काम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. या योजनेतून ३ एचपीच्या कृषीपंपासाठी सव्वातीन लाख रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ९७ हजार रुपयांचे तर राज्य सरकारकडून १६००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. लाभार्थ्यांनी ५ टक्के म्हणजेच जवळपास १६ हजार रुपये भरायचे आहेत. उर्वरित २ लाख रुपयांच्या आसपासची रक्कम कर्जाने मिळेल. या कर्जाचे हप्ते महावितरणच भरणार आहे. 
------------------
५० एकरांहून अधिक जागेची गरज 
मेगा पॉवरलूम क्लस्टरसाठी ५० एकरांहून अधिक जागा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने तीनपैकी एका जागेची निवड करा, असे सुचविले आहे. लवकरच जागेची पाहणी करणार आहोत. 
- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष, 
यंत्रमागधारक संघ, सोलापूर. 

Web Title: Discussion of three seats for 'Mega powerloom cluster' in Solapur, Hotgi lake, Kumbhari, Kumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.