सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक, २२ मे रोजी मंत्रालयावर ‘ढोल गर्जना’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:45 AM2018-05-14T03:45:25+5:302018-05-14T03:45:25+5:30

निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फडणवीस सरकारने पाळले नाही़ धनगर समाजाला एस़टी़नुसार सवलती देण्याऐवजी सत्तेवर येताच ‘टीस’ समिती नव्याने

Dhang Ghajna Morcha on May 22, 'Dhol Garjna' Front on the Ministry | सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक, २२ मे रोजी मंत्रालयावर ‘ढोल गर्जना’ मोर्चा

सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक, २२ मे रोजी मंत्रालयावर ‘ढोल गर्जना’ मोर्चा

Next

सोलापूर : निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फडणवीस सरकारने पाळले नाही़ धनगर समाजाला एस़टी़नुसार सवलती देण्याऐवजी सत्तेवर
येताच ‘टीस’ समिती नव्याने
नेमून सर्वेक्षण करायला लावून जखमेवर मीठ चोळले़ महाराष्ट्राच्या इतिहासात धनगर समाजाइतकी कोणत्याच समाजाची फसवणूक झाली नाही़
या सरकारने समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे़ या विरोधात २२ मे रोजी मंत्रालयावर राज्यभरातील समाजबांधवांना घेऊन ऐतिहासिक ढोल गर्जना मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
शेंडगे म्हणाले, १९५६ साली नेमलेल्या समितीने सर्वेक्षण करुन धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबसाठी असलेल्या( एस़टी़ ) आरक्षणानुसार सवलती देण्याची शिफारस केंद्राकडे केली होती़ त्यानंतर राज्य सरकारने या समाजाचा शेड्यूल ट्राईबमध्ये समावेशही केला़
मात्र ‘धनगर’ऐवजी ‘धनगड’ हा उल्लेख केला गेला आणि ४ पिढ्या उद्ध्वस्त झाल्या़ ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच आहे, याबाबतचे असंख्य पुरावे विधानसभेत दिले गेले तरी याची फारशी कुणी दखल घेतली नाही़ २०१४ च्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर-बारामती पदयात्रा काढून आंदोलन केले तसेच ९ दिवस उपोषण करुनही लक्ष वेधले़ हे उपोषण सोडवायला आलेले तत्कालीन भाजपा अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आलो की पहिल्याच कॅबिनेट बैठकीत विषय घेऊन अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याबाबत ग्वाही दिली़
आतापर्यंत जवळपास २२५ कॅबिनेट बैठका झाल्या़ पण एकदाही हा विषय त्यांनी हाती घेतला नाही़ हे सरकार झोपेचे सोंग घेतले असले तरी ढोल वाजवून त्याला जागे करणार आहोत़

रेकॉर्ड मोडणार...
आता निवडणुका एक वर्षाच्या टप्प्यावर आल्या आहेत़ आंदोलनाशिवाय पर्याय नाही़ २२ मे रोजी राज्यभरातून ११ हजार ढोल घेऊन आझाद मैदानावरुन वाजवत मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे़ यापूर्वीच्या आंदोलनात १,३५६ ढोल वाजवून रेकॉर्ड बे्रक केला होता़ हे रेकॉर्ड मोडून विश्वविक्रम करणार असल्याचेही माजी आमदार शेंडगे यांनी सांगितले़

Web Title: Dhang Ghajna Morcha on May 22, 'Dhol Garjna' Front on the Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.