साडेतीन हजार रूपये भाव दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही, ओंढीच्या शेतकºयांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:45 PM2017-10-23T16:45:20+5:302017-10-23T16:47:06+5:30

ऊसाला यंदा तीन हजार पाचशे रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावु द्यायचा नाही, कुठल्याही स्थितीत ऊसतोड करु द्यायची नाही असा निर्धार औंढी  ( ता़ मोहोळ ) येथील शेतक?्यांनी केला आहे.

Determine not be allowed to give a price of three and a half thousand rupees; | साडेतीन हजार रूपये भाव दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही, ओंढीच्या शेतकºयांचा निर्धार

साडेतीन हजार रूपये भाव दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही, ओंढीच्या शेतकºयांचा निर्धार

Next
ठळक मुद्देपाण्याच्या कमतरतेमुळे ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट... तर आमचा ऊस गुºहाळाला घालू

आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुरुल दि २३ : आपण सोळा महिने राब राब राबून पिकवलेल्या ऊसाला कारखानदार कवडीमोलाचा दर देवुन शेतक?्यांची बोळवण करतात. यामुळे आपल्या ऊसाला यंदा तीन हजार पाचशे रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावु द्यायचा नाही, कुठल्याही स्थितीत ऊसतोड करु द्यायची नाही असा निर्धार औंढी  ( ता़ मोहोळ ) येथील शेतक?्यांनी केला आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. शिवाय कारखान्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे आपल्याच कारखान्याला सर्वाधिक ऊस मिळावा यासाठी यंदा साखर  कारखानदार प्रयत्न करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर औंढी येथे  ग्रामस्थांनी  गावपातळीवर एक  शेतकरी मेळावा घेतला . या मेळाव्यात प्रतीतन तीन हजार पाचशे रुपये दर  दिल्याशिवाय ऊसाला कोयता लावु द्यायचा नाही अशी शपथ सर्व शेतकºयांनी घेतली.  ़
अनेक कारखान्याकडे  डीस्टलरी, को-जन,  असे  उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प असताना दर देण्यात कोणती अडचण आहे..? कारखानदार एका कारखान्यावर  दुसरा कारखाना उभा करतो, वेगवेगळ्या महागड्या  गाड्या घेतल्या जातात  मग शेतक?्यांच्या ऊसाला  दर देतानाच कशी अडचण येते  असा सवाल यावेळी  अनेक शेतक?्यांनी उपस्थित केला. 
दरम्यान या शेतकरी मेळ्याव्यास भीमाचे माजी संचालक  प्रकाश बचुटे,केराप्पा भुसे, भीमा चे संचालक दादासाहेब शिंदे, विजयप्रताप संघटनेचे अध्यक्ष  पांडुरंग बचुटे, जि.प.सदस्य शिवाजी सोनवणे, केशव पडवळकर, अंगद भुसे, राजुबापु भुसे, एकनाथ माळी, दाजी शिंदे, प्रदिप शिंदे, विजय शिंदे, सुभाष भुसे, आण्णा भुसे, विष्णु भुसे, अनिल भुसे, ज्ञानेश्वर बचुटे, दिगंबर भुसे, आण्णासाहेब शिंदे, सावकार भुसे, शिवाजी भुसे, रावण भुसे, औंदुबंर शिंदे, रवींद्र शिंदे, लिंगादेव माळी, सुभाष बचुटे, गणेश शिंदे, विजय भुसे, तानाजी शिंदे, दत्तादाजी भुसे, महादेव बचुटे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------
... तर आमचा ऊस गुºहाळाला घालू     
जर तुम्ही आंदोलन केले आणि तुमच्या ऊसाला मागणीनुसार दर मिळाला नाही तर ऊसाचे काय करणार..? या प्रश्नांवर शेतक?्यांनी आमचा ऊस गुºहाळाला घालु़
शिवाजी सोनवणे,
जि.प.सदस्य 
-----------------------
आम्ही सर्वाधिक दर देणार हे निश्चित _
शेतकरी व सभासदांनी भीमा कारखान्याला आजपर्यंत मोठे सहकार्य केले असुन यापुढे सुद्धा शेतकºयांच्या विकासाचाच विचार केला जाईल़ खा.धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील इतर कोणत्याही कारखान्यापेक्षा आमचा दर निश्चितच सर्वाधिक असेल़
दादासाहेब शिंदे,
संचालक, भीमा साखर कारखाना

Web Title: Determine not be allowed to give a price of three and a half thousand rupees;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.