अधिक मासानिमित्तपांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:43 PM2018-05-17T12:43:49+5:302018-05-17T12:43:49+5:30

मंदिर समितीच्यावतीने भाविकांसाठी सर्वसुविधा सज्ज, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती, अधिकमासास प्रारंभ; दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू

A crowd of devotees around Pandharpur for a visit to the Massa Mahitatpanduranga | अधिक मासानिमित्तपांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात भाविकांची गर्दी

अधिक मासानिमित्तपांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात भाविकांची गर्दी

Next
ठळक मुद्देबुधवारपासून अधिकमासास प्रारंभ झालाविठ्ठलाच्या पावन नगरीत लाखोंच्या संख्येने भाविक दाखलभाविकांना योग्य प्रकारच्या सोई सुविधा देण्यासाठी मंदिर समिती सज्ज

पंढरपूर : बुधवारपासून अधिकमासास प्रारंभ झाला असून विठ्ठलाच्या पावन नगरीत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. पंढरीत येणाºया भाविकांना योग्य प्रकारच्या सोई सुविधा देण्यासाठी मंदिर समिती सज्ज  असल्याची माहिंती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

१६ मे ते १३ जून या कालावधीत अधिकमास आहे. या अधिकमास येणाºया भाविकांची गैर सोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीने उपाययोजना केल्या आहेत़ ‘श्री’ च्या पदस्पर्शदर्शन रांगेत कासार घाट ते पत्राशेडपर्यंत बॅरेकेटींग व त्यावर ताडपत्रीशेड घालण्यात आले आहे. मंदिर परिसरामध्ये २ अद्यावत रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मंदिर व परिसर, दर्शन रांगेत प्रथोमोपचार पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत.

नेहमीच्या पोलिसांव्यतिरिक्त नातेपुते येथील महाराष्टÑ कमांडो फोर्ड यांच्याकडील ३० कंमांडोज बंदोबस्तासाठी ठेवलेले आहेत़ बाजीराव पडसाळी येथील धोकादायक स्लॅब काढलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी चंद्रभागा वाळवंट येथे यापूर्वी ४ चेजिंग रुम उभारण्यात आल्या होत्या. आता त्याठिकाणी आणखी ४ चेजिंग रुम उभारण्यात आल्या आहेत. 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात शिवदत्त डेकोरेटर्स, पुणे यांच्या वतीने लाईटींग डेकोरेशन करण्यात आले आहे. दर्शनरांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी देण्याचे दृष्टीने त्याठिकाणी शुध्द पाणी देण्यात येत आहे. या पाणीवाटपासाठी विश्व सामाजिक सेवा संस्था, आळंदी देवाची, ता. हवेली, जि. पुणे या स्वंयसेवी संस्थेचे स्वयंसेवक काम करणार आहेत.

भाविकांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आॅनलाईन व व्ही. आय. पी. दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. समितीच्या वेदांता भक्तनिवास, व्हिडीओकॉन भक्तनिवास व एमटीडीसी भक्तनिवास येथील सर्व रुम भाविकांना अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

अधिक मासानिमित्त भाविकांकडून प्राप्त होणाºया देणगी पावती त्यांना देण्यासाठी जादा रोजंदारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच पुणे येथील विठ्ठल सेवा मंडळाचे २० स्वयंसेवक देणगी घेण्याचे काम करणार आहेत. तसेच देणगी जमा करण्यासाठी जादा स्टॉल उभारण्यात आले आहेत. आॅनलाईन डोनेशन व्यवस्था सुरु ठेवण्यात आली आहे. भाविकांना श्रीचे लाईव्ह दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान या अ‍ॅपवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनरांगेत दर्शनार्थी भाविकांची संख्या निश्चित करण्यासाठी यंत्र बसविण्यात आले आहेत.

कर्मचारी व स्वयंसेवी संस्था - देणगी जमा करणे, पाणी वाटप करणे, स्वच्छता व्यवस्था व इतर अनुषंगीक कामासाठी कायम कर्मचाºयांच्या व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रोजंदारी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेकडील स्वयंसेवक काम करण्यात आहेत, अशा पद्धतीने नियोजन केल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

Web Title: A crowd of devotees around Pandharpur for a visit to the Massa Mahitatpanduranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.