मोडनिंबजवळ कार व कंटेनरचा अपघात, दापोडी येथील पती-पत्नी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:17 PM2017-11-23T15:17:59+5:302017-11-23T15:20:49+5:30

सोलापूरहुन पुण्याकडे जाणाºया फॉरच्युअनर कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडला़

A car and a container accident near Modnibam, the husband and wife of Dapodi killed on the spot | मोडनिंबजवळ कार व कंटेनरचा अपघात, दापोडी येथील पती-पत्नी जागीच ठार

मोडनिंबजवळ कार व कंटेनरचा अपघात, दापोडी येथील पती-पत्नी जागीच ठार

Next
ठळक मुद्देसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घटनाअपघातानंतर मोडनिंब पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखलसोलापूर जिल्ह्यातील अपघाताचे सत्र सुरूच


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : सोलापूरहुन पुण्याकडे जाणाºया फॉरच्युअनर कारने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडला़
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,  सोलापूरहुन पुण्याकडे भरधाव वेगात जाणारी फॉरच्युअनर कार (एमएच १४ इआर ०९२८) ही कार अतिवेगात पुण्याकडे जात होती़ यावेळी मोडनिंबनजीक पुण्याकडे जाणाºया कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली़ या धडकेत कारमधील दोघांना जबर मार लागला़ यात दोघांचा जागीच मृत्यू झाला़ कारमधील दोघे हे पती-पत्नी असल्याची माहिती समोर आली असून त्यांची नावे संजय व रीना अशी असून दोघेही दापोडी येथील असल्याची माहिती पुढे आली आहेत़ 

Web Title: A car and a container accident near Modnibam, the husband and wife of Dapodi killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.