सोलापूर जिल्ह्यावर भाजप प्रांतिक कार्यकारिणीचे लक्ष; बापूंवर माढा तर पालकमंत्र्यांवर सोलापूरची जबाबदारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:00 PM2019-03-18T13:00:56+5:302019-03-18T13:07:16+5:30

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ सहकारमंत्री सुभाष देशमुख तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर देण्यात आली ...

BJP's provincial executive's attention in Solapur district; Bapu Maradha and Guardian Minister responsible for Solapur! | सोलापूर जिल्ह्यावर भाजप प्रांतिक कार्यकारिणीचे लक्ष; बापूंवर माढा तर पालकमंत्र्यांवर सोलापूरची जबाबदारी !

सोलापूर जिल्ह्यावर भाजप प्रांतिक कार्यकारिणीचे लक्ष; बापूंवर माढा तर पालकमंत्र्यांवर सोलापूरची जबाबदारी !

Next
ठळक मुद्देभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांनी घेतली पदाधिकाºयांची बैठकपदाधिकाºयांना विधानसभानिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आलेप्रदेश कार्यकारिणीचे लोक कामांचा आढावा घेणार

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ सहकारमंत्री सुभाष देशमुख तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र दोन्ही मंत्र्यांनी दोनही मतदारसंघातील कामांवर लक्ष ठेवावे. विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप व्हावे, असा निर्णय भाजपा पदाधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला. 

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य रघुनाथ कुलकर्णी आणि विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत सरस्वती चौकातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, भाजपाचे शहर सरचिटणीस विक्रम देशमुख, हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. 

सोलापूर आणि माढ्यातील भाजपाचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. पण पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करण्याच्या दृष्टीने कामाला लागा, असे कुलकर्णी यांनी सांगितले. या बैठकीत पदाधिकाºयांना विधानसभानिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले. दोन देशमुखांनी दोनही मतदारसंघातील परिस्थितीवर लक्ष ठेवावे. हे दोनही मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपाकडे आलेच पाहिजेत, असेही सांगण्यात आले. प्रदेश कार्यकारिणीचे लोक कामांचा आढावा घेणार आहेत. 

पंढरपूर-मंगळवेढ्याची जबाबदारी परिचारकांकडे
च्या बैठकीत पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे देण्यात आली. 
- शहर उत्तरची जबाबदारी विक्रम देशमुख, मध्य - हेमंत पिंगळे, पांडुरंग दिड्डी, दक्षिण - रामप्पा चिवडशेट्टी, दत्तात्रय गणपा,        अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी,  मोहोळ-उत्तर सोलापूर - संजय क्षीरसागर, काळे, काशिनाथ कदम यांच्यावर देण्यात आली आहे. 

Web Title: BJP's provincial executive's attention in Solapur district; Bapu Maradha and Guardian Minister responsible for Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.