'भाजप सरकार हाय हाय ; पुढच्या वर्षी बाय बाय', सोलापूरात राष्ट्रवादीचा भाजप विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:07 PM2017-11-01T13:07:04+5:302017-11-01T13:09:05+5:30

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी  सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले.

 'BJP Government Hi Hi; Next year, bye Bye ', a rally against the NCP's BJP in Solapur | 'भाजप सरकार हाय हाय ; पुढच्या वर्षी बाय बाय', सोलापूरात राष्ट्रवादीचा भाजप विरोधात मोर्चा

'भाजप सरकार हाय हाय ; पुढच्या वर्षी बाय बाय', सोलापूरात राष्ट्रवादीचा भाजप विरोधात मोर्चा

Next
ठळक मुद्देभाजप सरकारच्या तीन वर्षाच्या सुमार कामगिरीच्या विरोधात तीव्र निदर्शनेगणपती घाटावर घातले सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध आणि पिंडदानभाजपचे तीन साल महाराष्ट्र बेहाल "च्या घोषणांनी गणपती घाट परिसर दणाणला


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ :  सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी  सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी मुंडन करून भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या सुमार कामगिरीच्या विरोधात निदर्शनेहि करण्यात आली.   
३० आॅक्टोबरला राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली . त्यामुळे ३० तारखेपासून ८ नोव्हेंबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे . ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला एक वर्ष होत आहे. सरकारच्या या निर्णयाचे अपयश ठळकपणे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात येत आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीच्यावतीनेसुद्धा  पिंडदान करून श्राद्ध घालण्यात आले़ नोटांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच मुंडणही करण्यात आले.मृत्यूनंतर ज्या गणपती घाटावर पिंडदानाचा विधी उरकला जातो त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणीच सोलापूर राष्ट्रवादीने आंदोलन करून सरकारच्या कामगिरीचा निषेध नोंदविला. 
याप्रसंगी माजी महापौर मनोहर सपाटे,जनार्दन कारमपूरी,माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी गटनेते पद्माकर काळे, परिवहन सभापती राजन जाधव,सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार,अल्पसंख्याक अध्यक्ष राजू कुरेशी,नगरसेविका सुनीता रोटे,मनीषा नलावडे,सुनंदा साळूखे,विठ्ठलसा चव्हाण,जनार्दन बोराडे,प्रशांत बाबर,आनंद मुस्तारे,जावेद खैरदी,महेश कुलकर्णी,युवराज राठोड,ओंकार हजारे,शाम  गांगर्डे यांच्यासह शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  'BJP Government Hi Hi; Next year, bye Bye ', a rally against the NCP's BJP in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.