आण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदी विरुद्ध वचनभ्रष्टतेचा आरोप,  येत्या २३ मार्चपासून रामलीला मैदानावर जनांदोलन करणार, आण्णा हजारे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:24 AM2018-01-29T11:24:59+5:302018-01-29T11:27:16+5:30

निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला.

Anna Hazare's allegations against PM Modi, Anna Hazare's information will be organized from 23rd March at Ramlila Maidan, Anna Hazare | आण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदी विरुद्ध वचनभ्रष्टतेचा आरोप,  येत्या २३ मार्चपासून रामलीला मैदानावर जनांदोलन करणार, आण्णा हजारे यांची माहिती

आण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदी विरुद्ध वचनभ्रष्टतेचा आरोप,  येत्या २३ मार्चपासून रामलीला मैदानावर जनांदोलन करणार, आण्णा हजारे यांची माहिती

Next
ठळक मुद्देमोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला : अण्णा हजारे पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही : अण्णा हजारे तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल : अण्णा हजारे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
आळंद दि २९ : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे व शेतकºयांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या साडेतीन वर्षात मोदींनी काहीच केले नसल्यामुळे हे वचन भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कलबुरगी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केला. 
शेतकºयांच्या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेच्यावतीने कलबुरगी येथील शरणबसवेश्वर संस्थान मैदानावर अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नवी दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ.एस.ए.पाटील कलबुरगीच्या श्रीगुरू विद्यापीठाचे अध्यक्ष बसवराज दिग्गावी, जेष्ठ पत्रकार श्रीनिवास शिरनूरकर यांनीही आपल्या भाषणात शेतकºयांच्या प्रश्नावर व प्रशासनातील भ्रष्टाचारावर आपली परखड मते मांडली. हैदराबाद कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष दयानंद पाटील हे अध्यक्षपदी होते. दयानंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेचे धर्मेंद्र उद्देष सादर केले.  
यावेळी बोलताना अण्णा पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला असून पंतप्रधान मोदींना याविषयी मी ३२ वेळा पत्रे लिहिली पण आजपावेतो एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही तेव्हा आमच्यापुढे जनांदोलनाशिवाय पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येत्या २३ मार्चला दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलन छेडण्यात येईल. शेतकरी आत्महत्येविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की,बँका व सावकारी जबर कर्जाच्या दबावामुळे गेल्या १२ वर्षात एकूण २२ लाख शेतकºयांनी आत्महत्त्या केल्या आहेत पण माझी शेतकºयांना विनंती आहे की,यापुढे त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. राज्या राज्यात कृषीमुल्य आयोग कार्यरत आहेत पण या आयोगाच्या शिफारशीला केंद्र सरकार पन्नास टक्के कात्री लावते हे अन्याकारक आहे असे स्पष्ट करत अण्णा पूढे म्हणाले की, उद्योगपतींना धार्जिणे असलेल्या या केंद्र सरकारला शेतकºयांविषयी अजिबात काळजी नाही. कर्नाटकातील विद्द्यमान महादायी योजनेविषयी चाललेल्या वादविवादावर बोलताना अण्णा म्हणाले की, यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असून प्रश्न सोडविण्याची प्रामाणिक इच्छा असल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अनेक राज्यांना पाणी वाटपाच्या समस्येने ग्रासले असून नेते असे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यामध्ये राजकीय लाभाचा विचार करून प्रश्र्न लोंबकळत ठेवतात हे लोकशाहीमध्ये अत्यंत लाजीरवाणे आहे. 
या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. विजयपूर ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे यावेळी सानिध्य लाभले होते.
 

Web Title: Anna Hazare's allegations against PM Modi, Anna Hazare's information will be organized from 23rd March at Ramlila Maidan, Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.